घरलाईफस्टाईलतुमची टाच दुखते? हे करा उपाय

तुमची टाच दुखते? हे करा उपाय

Subscribe

टाच दुखीवर उपाय

बऱ्याचदा आपण जेवण झाले की, चालतो किंवा सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकला देखील जातो. मात्र, अशावेळी लक्षात येते की, आपल्या पायाच्या टाचा फार दुखत आहेत. विशेष म्हणजे ही समस्या तीव्रतेने जाणवते. साधारणत: चाळिशी ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये टाचदुखीची समस्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळते. या टाचदुखीवर काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे ही समस्या दूर होऊ शकते.

पायांना शेक

- Advertisement -

टाच दुखत असताना कोमट पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि या पाण्यामध्ये १५ ते २० मिनिटे पाय टाकून बसावे. यामुळे पायांना शेक मिळण्यास मदत होईल आणि टाचदुखीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

एक्ससाईज

- Advertisement -

पायाची टाच दुखत असल्यास फिजिओ थेरेपीचे काही सोपे व्यायाम, एक्ससाईज असतात ते करावेत. यामध्ये भिंतीला हात टेकून पायाच्या बोटांवर उभे राहावे आणि टाचा वर उचलाव्यात. तसेच या स्थितीमध्ये जागच्या जागी जॉगिंग करायाचा प्रयत्न करावा.

खोबरेल तेल

खोबरेल तेल सर्वच व्याधींवर एक रामबाण उपाय आहे. रात्री झोपताना थोडेसे खोबरेल तेल घेऊन चांगले कोमट करावे. त्या तेलाने टाचाना चांगले मॉलिश करावे. यामुळे टाच दुखण्यापासून आराम मिळतो.

मऊ चप्पलचा वापर

टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. त्यामुळे अनेक वेळा हिवाळा आणि पावसाळा या ऋतूंमध्ये टाच दुखते. अशावेळी घरात मऊ चप्पल किंवा स्लीपरचा वापर करावा. फायदा होतो.

गोडेतेल आणि मीठ

गोडेतेल आणि मीठ एकत्र करुन हा लेप टाचेवर लावावा. त्यानंतर टाच सुती कापडाने बांधून ठेवावी. यामुळे आराम मिळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -