घरलाईफस्टाईलमांसाहारावर ताव मारताना लक्षात ठेवा या गोष्टी

मांसाहारावर ताव मारताना लक्षात ठेवा या गोष्टी

Subscribe

अनेकदा डाएट प्लॅन हा भाज्या, फळांभोवतीच सीमित असतो. फार फार तर त्यामध्ये अंड्याचा समावेश करून डाएट चार्ट आखून दिला जातो. पण मासे, मांस याचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करूनदेखील डाएट सांभाळता येऊ शकतो. मग मांसाहारींनो वजन आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्हाला आता आवडत्या पदार्थांना दूर ठेवायची काहीच गरज नाही. पण मांसाहारावर ताव मारताना या डाएट टिप्स मात्र जरूर लक्षात ठेवा.

दिवसभरात किती प्रोटीन खावे ?
मांसाहाराच्या जेवणात मांस, अंडी, मासे आणि दुग्धजन्य पदार्थ अधिक असल्याने प्रोटीन्स मुबलक प्रमाणात शरीराला मिळते. पण त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वेट ट्रेनिंग घेणार्‍यांनी त्याच्या व्यायामानुसार प्रोटीन्सचे प्रमाण निवडावे.

- Advertisement -

मांस कसे खावे ?
मांस व्यवस्थित शिजवून खाणे हेच योग्य आहे. मांसामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात. यामुळे रक्त/ रक्ताच्या गुठळ्या घट्ट होतात. त्यामुळे मांस खाण्यासाठी पुरेसे शिजणे आवश्यक आहे. मांस खाण्यासाठी ते थोड्याशा तेलावर ग्रिल्ड, वाफवलेले, शिजवलेले किंवा भाजलेले असावे.

मांस खाणे कोणी टाळावे ?
मधूमेह, रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्यांनी रेड मीट खाणे टाळावे. अशा रुग्णांमध्ये फॅट साचून ब्लॉकेजेस तयार होणे धोकादायक ठरू शकते. त्यांच्या आहारात लो-फॅट पदार्थांचा अधिक समावेश असणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी मासे हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये मॅग्नेशियम व ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा समावेश असतो. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

- Advertisement -

मांसाहारींच्या आहारासाठी खास डाएट टिप्स –
*हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी, हेल्थ कॉन्शियन्स असलेल्यांनी रेड मीट पंधरा दिवसांतून एकदाच खावे. तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य व्यायामदेखील करा.
*दिवसभर बसून काम करत असाल तर आठवड्यातून केवळ 1-2 अंडी खावीत किंवा केवळ अंड्याचा पांढरा भाग खावा.
*आहारात मासे किंवा चिकन, टर्की यांसारखे व्हाईट मीट ठेवा. तसेच डीप फ्राय करणे टाळा.
*अंड उकडणे किंवा हाफ बॉईल करणे हे तळण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहे. मासे/अंडी फ्राय केल्याने त्यातील प्रोटीन्स कमी होतात व पचायला कठीण होतात.
*प्रोटीन्सयुक्त पदार्थातून हीट बाहेर पडते तसेच ते पचायला जड असतात. त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
*युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढलेले असल्यास मांस खाणे टाळा.

सॅम्पल नॉन व्हेजिटेरियन डाएट चार्ट –
ब्रेकफास्ट : टोस्ट + 3 अंड्यांचा पांढरा भाग + 1 अंड्याचा पिवळा भाग व भाज्या
मिड मॉर्निंग़ : फ्रुट + नट्स ( सुकामेवा)
दुपारचे जेवण : सॅलेड + चपाती /भात + भाजी + सुकं किंवा ग्रेवी चिकन
संध्याकाळचा नाश्ता : मोड आलेली कडधान्य/चिकन सॅलेड/चिकन रोटी रोल्स
रात्रीचे जेवण :सूप + सॅलेड + मासे / चिकन (ग्रिल्ड /बेक्ड/वाफवलेले)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -