घरलाईफस्टाईलडोळ्यांचा थकवा दूर करा

डोळ्यांचा थकवा दूर करा

Subscribe

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक कामे करत असतो. ही कामे करताना आपले डोळे महत्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. अनेकदा कामानिमित्त आपणास जागरण घडते. त्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवतो. मोबाईल आणि कमी झोप यामुळे डोळ्यांना थकवा जाणवतो. परिणामी डोळे दुखणे, सूज येणे अशा समस्या आपल्याला जाणवू लागतात. हा त्रास जास्त वाढला तर अनेक गंभीर समस्यांनाही सामोरे जावे लागते. डोळे लाल होणे, जळजळ होणे, नीट न दिसणे, डोळे कोरडे पडणे, धुसर दिसणे अशाही समस्या होतात. काही घरगुती उपायांद्वारे डोळ्यांचा थकवा दूर करता येतो. ते कसे ते पाहूया…

थंड पाणी किंवा बर्फाने डोळ्यांना शेक द्या
दिवसभर काम केल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. काम करताना थोड्या थोड्या वेळाच्या फरकाने डोळ्यांवर थंड पाण्याने धुवावे. असे केल्याने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते. तसेच डोळ्यांना सूज आल्यास बर्फाने डोळ्यांना शेक द्यावा. यासाठी एका स्वच्छ सुती कापडात बर्फ ठेवा आणि डोळ्यांना लावा. असे केल्याने ५ ते १० मिनिटांत डोळ्यांची सूज कमी होईल. त्यासोबतच डोळ्यांना आरामही मिळेल.

- Advertisement -

गुलाबपाणी, काकडीचा वापर करा 
गुलाबपाणी हे डोळ्यांसाठी नैसर्गिक रिलॅक्सर म्हणून काम करतं. सोबतच याने डोळ्यांखाली झालेले डार्क सर्कलही दूर होतात. त्वचा मुलायम आणि आकर्षक दिसते. तसेच गुलाबजलच्या दररोजच्या वापराने डोळे चांगले राहतात. तसेच काकडीचे स्लाईस डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांचा थकवा दूर होतो. याने तुमच्या डोळ्यांना थंड वाटेल आणि तुमचा थकवा दूर होईल.

डोळ्यांचा व्यायाम                                                                                                              डोळ्यांवरील थकवा दूर करण्यासाठी डोळ्यांचा व्यायाम महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने डोळ्यांचा व्यायाम करावा. त्यामुळे डोळ्यांतील रक्तसंचारही नीट होतो. याने डोळ्यांच्या मासंपेशीही लवचिक होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -