घरलाईफस्टाईलअसे हटवा त्वचेवरून हेअर कलरचे डाग

असे हटवा त्वचेवरून हेअर कलरचे डाग

Subscribe

जर आपण घरीच हेअर कलरींग करत असाल आणि खूप दक्षता बाळगूनही तो कलर तुमच्या त्वचेचा लागला तर काळजी करु नका. त्वचेवर लागलेला हा कलर कसा हटवायचा याविषयी तुम्हाला सांगणार आहोत काही टिप्स.

* कापूस नेलपॉलीश रिमुव्हरमध्ये बुडवून त्याने त्वचेवर लागलेला हेअर कलर साफ करा.त्यामुळे किंचीत जळजळ होईल पण घाबरु नका. जर नेलपॉलीश रिमुव्हरची अ‍ॅलर्जी असेल तर त्याचा वापर करु नका.

- Advertisement -

* त्वचेच्या ज्या भागात हेअर कलर लागला असेल तिथे टुथपेस्ट लावा आमि ती चांगल्याप्रकारे वाळू द्या. जेव्हा पेस्ट सुकून जाईल तेव्हा ती धुवून काढा.

* बेबी ऑईल किंवा ऑलिव्ह ऑईल त्वचेवरील हेअर कलरचे डाग काढण्यात प्रभावी भूमिका बजावतात.या पैकी कोणत्याही एका तेलाने कलर लागलेल्या जागी थोडावेळ मसाज करावा आणि नंतर तो पाण्याने धुवावा.

- Advertisement -

* कलर लागलेल्या त्वचेवर कापसाच्या मदतीने पेट्रोलियम जेली लावून मसाज करावी. तीन ते चार वेळा मसाज केल्यास हेअर कलरचे डाग हमखास जातील.

* मेक-अप रिमुव्हरही हेअर कलरचे डाग हटवण्यास मदत करतात. ते कापसाने डागांवर लावावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -