फोनमध्ये व्हायरस शिरलाय?

घाबरू नका, त्याला असा बाहेर काढा

Mumbai
Mobile Phone

तुमच्या स्मार्ट फोनमध्ये व्हायरस आला असेल तर घाबरू नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगत आहोत, ज्याच्याद्वारे आपण स्मार्ट फोनमध्ये शिरलेला व्हायरस काढू शकता. तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये व्हेरिफाईड अ‍ॅप्स असेल तर चिंताच नाही. पण नसेल तर घाबरण्याचे कारण नाही.

फोनमध्ये व्हायरस आला हे कसे ओळखाल?
फोनमध्ये व्हायरस असेल तर फोन स्लो होतो. याशिवाय व्हायरस तुमचा वैयक्तिक डेटाही लीक करतो. त्यामुळे तुम्ही मोबाईल फोन मग गॅलरीत नेऊन देता. तेही भरमसाठ बिल लावतात. त्यापेक्षा पुढील स्टेप करा आणि मोबाईल चांगला करा.

पहिला उपाय
सर्वप्रथम व्हायरस रिमूव्ह करण्यासाठी आपला स्मार्टफोन सेफ मोडमध्ये टाकावा लागतो.सेफ मोड ऑन करण्यासाठी स्मार्टफोनच्या पॉवर बटनला थोडा वेळ दाबून ठेवा. त्यानंतर पावर ऑफला प्रेस करुन ठेवा. असे केल्यावर तुमचा मोबाईल सेफ मोडवर जाणार.

दुसरा उपाय
तुम्ही पावर बटन प्रेस करुन फोन ऑफ करू शकता. त्यानंतर पावर बटनला पुन्हा प्रेस करा. याला तोपर्यंत प्रेस करुन ठेवा जोपर्यंत तुमच्या डिवाईसवर मॅन्युफॅक्चर्रचा लोगो डिस्प्ले होत नाही. त्यानंतर लगेच व्हॉल्यूम बटनला खालून प्रेस करा. असे केल्याने तुमच्या फोन स्क्रीनच्या खालील भागात सेफ मोड, असे लिहिलेले डिस्प्ले होणार.

अशा प्रकारे रिमूव्ह करा व्हायरस
फोनला सेफ मोडमध्ये टाकल्यानंतर सेटिंग्सच्या माध्यमातून अ‍ॅप्समध्ये जा. डाऊनलोड ऑप्शन ओपन करा. डाऊनलोडमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे निश्चित करावे लागेल, की कोणते अ‍ॅप्स तुमच्या कामाचे आहेत आणि कोणते नाही. जर कोणता असा अ‍ॅप तुमच्या नजरेस पडतो ज्याला तुम्ही डाऊनलोड केलेले नाही तर त्वरित त्याला अनइन्स्टॉल करा. असे केल्याने तुमच्या मोबाईलमधील व्हायरस रिमूव्ह होणार.

सेफ मोडमधून बाहेर कसे पडाल?

पहिला उपाय
फोनच्या पावर बटनला प्रेस करुन ठेवा आणि रिस्टार्टवर टॅप करा. असे केल्याने तुम्ही सेफ मोडमधून बाहेर येता.व्हायरस रिमूव्ह करण्यासाठी

दुसरा उपाय
यासाठी तुम्हाला स्मार्टफोनला फॅक्ट्री रिसेट करावे लागेल. फॅक्ट्री रिसेट करण्यापूर्वी आपला महत्त्वाचा आणि वैयक्तिक डेटा सेव्ह करून ठेवा. यामुळे तुमचे महत्वाचे फोटो आणि कॉन्टॅक्ट्स डिलीट होणार नाही. फॅक्ट्री रिसेट केल्यानंतर तुम्हाला फोनमध्ये पुन्हा सर्व अ‍ॅप्स डाऊनलोड करावे लागतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here