जुन्या कपड्यांचा ‘असा’ करा पुनर्वापर

Mumbai

प्रत्येक कुटुंबातील कपाटात भरभरून कपडे असतात. नवं नवीन फॅशन बाजारात येत असल्यामुळे आपण त्या फॅशनेबल कपड्याची खरेदी करतो. आपल्याला कोणी प्रेमाने गिफ्ट म्हणून दिलेले असतात तर कधी लग्न कार्यात मिळालेले असतात. काही जणांना कपडे खरेदी करण्याची प्रचंड हौस असते. त्यामुळे कपाट खूप भरत. मग या कपड्यांचे करायचे काय असा प्रश्न मनात तयार होतो? आपल्याला आपले कपडे फेकून द्यायला देखील आवडत नाही. अशा वेळी या कपड्यांचा पुनर्वापर करु शकता. या कपड्यांचा उपयोग तुम्ही वेगळ्या पध्दतीने करू शकता. हेच तुम्हाला आज सांगणार आहोत.

१) उशी कव्हर

उशीसाठी तुम्ही जुन्या टिशर्टचा वापर करू शकता. टिशर्टचा गळ्याचा भाग आणि हाताचा भाग कापून आयताकृती उरलेला भाग तुम्ही उशीच्या आकारानुसार शिवू शकता.

२) क्रोकरी क्लिनर

तुमच्या नाजूक वस्तू साफ करण्यासाठी तुम्ही टिशर्ट, बनियनचा कपडा वापरू शकता. कारण टिशर्ट आणि बनियनचा कपडा हा नरम आणि मुलायम असतो. त्यांचे चौकोनी आकारात तुकडे कापून तुम्ही क्रोकरी क्लिनर म्हणून वापरू शकता.

३) पायपुसणी

तुम्हाला जे कपडे फाडायचे असतील. ते कपडे ४ ते ५ इंच लांब लांब कापावे. ते लांब लांब कापलेल्या कपड्यांचे तुकडे जोडून त्याची वेणी बांधावी. पायपुसण्याचा जितका मोठा आकार तितके तुकडे तुम्हाला जोडून घ्यावे लागतील. जेव्हा वेणी घालून होईल तेव्हा वेणीचे एक टोक घेऊन गोलाकार आकारात गुंडाळायला घ्यायचे. पाय पुसण्याचा आकार किती हवा आहे त्यानुसार तुम्हाला गुंडाळायचे. तुमचे कपडे कलरफुल असतील तर ते पायपुसणे खूप सुंदर दिसेल.

४) हेअरबँड

पहिल्यांदा तुमच्या डोक्याचे माप घेऊन एखाद्या कपड्याचा लांब तुकडा कापा. मग त्यानंतर गाठ किंवा शिलाई मारुन घ्या. तसेच तुम्ही एखाद्या कपड्याचे छोट्या छोट्या पट्या कापून त्याची वेणी बांधून हेअरबँड तयार करु शकता.

५) बॅग

तुमच्याकडे असलेल्या जीन्सवरील टॉप किंवा टिशर्टचा वापर करुन बॅग बनवू शकता. तुम्हाला बॅगचा आकार जसा पाहिजे आहे तसा आकार कापून घ्या आणि खालील भाग शिवून घ्या. तसेच टॉप किंवा टिशर्टच्या बाह्या कापून टाका. तुमच्याकडे असलेल्या क्रिएटिव्हिटी नुसार बॅगचे वेगवेगळे डिझाईन करु शकता.