घरलाईफस्टाईलरूमेटोइड आर्थराइटिस (आमवात)

रूमेटोइड आर्थराइटिस (आमवात)

Subscribe

रूमेटोइड आर्थराइटिस (आमवात) हा एक प्रकाराचा संधिवात असून या आजाराचा डॉक्टकांकडून वेळीच सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

रूमेटोइड आर्थराइटिस (आमवात) हा एक प्रकाराचा संधिवात आहे, जो १०० पैकी व्यक्तीस होतो. महिलांमध्ये आमवाताचे प्रमाण अधिक असले तरी, पुरुष आणि लहान मुलाना पण आमवात होऊ शकातो. वेळेत योग्य उपचार सुरु केले नाही, तर सांध्यामध्ये विकृती येते आणि एकूण जीवनमान बिघडते. सुमारे ५० वर्षांपूर्वी बऱ्याच रुग्णांना आमवातामुळे व्हील चेअरवर किंवा अंथरूणावर आयुष्य घालवावे लागले. कारण प्रभावी उपचार उपलब्ध नव्हते. पण आता उपचारांसाठी चांगली औषधे उपलब्ध आहेत. तरी आजही आमवाता बद्दल अनेक गैरसमज आहेत. रुग्ण दीर्घकाळापर्यंत औषध घेण्यास नकार देतात. आमवात पीडित रुग्णांना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की वेळेत प्रभावी औषधे सुरू केल्याने आता जीवन शैली सुधारणे शक्य आहे. ज्यांनी पूर्वी योग्य उपचार केले नव्हते, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे, की कोणत्याही क्षणी उपचार सुरू करून सूज आणि वेदना कमी करणे शक्य आहे, जेणेकरून भविष्यकाळ त्रासदायक होणार नाही.

आमवाताची लक्षणे कोणती?

सुरुवातीस रुग्णांचे सांधे दुखतात (सामान्यतः गुडघे, बोटांचे सांधे, मनगट, पाय), सांधे आखडतात आणि थकवा येतो. बऱ्याच लोकांना सुरुवातीला फक्त हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सांधे दुखतात. पुढे पुढे सतत सांधे दुखतात, सांध्याना सुज येते, सांध्याच्या हालचाली मर्यादित होतात.

- Advertisement -

आमवाताचे निदान कसे करतात?

आमवाताचे निदान ‘क्लिनीकल’ आहे. याचा अर्थ र्यूमेटोलॉजिस्ट्स रुग्णाची लक्षणे आणि रुग्ण तपासून हे निदान करतात. संधिवात निदान करण्यापूर्वी काही चाचण्या केल्या जातात. – CBC, ESR, Urine, RF test, anti-CCP. सुरुवातीला रोगात एक्स-रे normal असतो. आमवाताच्या ३०४०% रूग्णांमध्ये RA-Test नकारात्मक असू शकते. संशयास्पद केसमध्ये लवकर निदान करण्यासाठी MRI स्कॅनचा उपयोग होतो.

आमवातासाठी उपचार काय आहे ?

आमवातासाठी DMARDs (Disease Modifying Anti Rheumatic Drugs), वेदना शामक आणि पेनकिलर्स (DMARD ची क्रिया सुरु होई पर्यंत), कधीकधी सूजलेल्या सांध्यात स्टेरॉइड इंजेक्शनने देतो. जेव्हा जास्त सूज येते तेव्हा स्प्लिंट दिला जातो. सूज कमी होते त्या वेळी स्नायूंना मजबूत करण्यासाठी व्यायाम देण्यत येतो. १९९९ पासून आमवाताच्या उपचारांसाठी अनेक नवीन औषधे आली आहेत. Biologics आणि small molecules ही नवीन औषधे आहेत. Biologics ही इंजेक्शन्स आहेत. तर small molecules गोळ्या आहेत. ही नवीन औषधे आमवाताच्या उपचारांसाठी क्रांतिकारक आहेत. आमवातासाठी चांगली औषधे उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना विकृती येऊ नये. त्यांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की बहुतेक रुग्णांमध्ये उपचार दीर्घकाळ (आयुष्यभर ) घेणे आवश्यक आहे. औषधांच्या डोसचे समायोजन करण्यासाठी आणि औषधांच्या साइड इफेक्ट्सच्या देखरेखीसाठी नियमितपणे Rheumatologist ला दाखवले पाहिजे. रुग्णांनी अनिश्चित स्टेरॉईड्स घेऊ नये; कारण त्यात नुकसान जास्त आहे. अनियंत्रित inflammation (सूज) असल्यास, आमवाताच्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. जसे अनियंत्रित मधुमेहाच्या रुग्णांना हार्ट अटॅकची जोखीम जास्त असते. म्हणून आमवाताच्या संपूर्ण नियंत्रणाचे (achieve complete remission चे) हे आणखी एक कारण आहे. योग्य रक्तदाब किंवा मधुमेह नियंत्रणासारख संधिवातांचे संपूर्ण नियंत्रण महत्वाचे आहे. जर सांधे गंभीरपणे नुकसानग्रस्त झाले तर धातुचे कृत्रिम सांधे शस्त्रक्रिया करून बसवता येतात.

- Advertisement -

हे माहित असणे महत्वाचे आहे की प्रत्येक सांधेदुखी म्हणजे आमवात नाही. सांधेदुखी हे निदान नाही. हे एक लक्षण आहे, जे रूमेटोइड आर्थराइटिस (आमवात), ल्यूपस, गॉउट, सोओरीटिक आर्थराइटिस, चिकनगुनिया इत्यादी अनेक रोगांमधे येऊ शकते. उपचार वाताच्या प्रकारावर अवलंबून असतात. योग्य निदान आणि उपचारांसाठी रुग्णांनी संधिवातशास्त्रज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

डॉ. योजना गोखले; संधिवात तज्ञ, सायन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -