घरलाईफस्टाईलउष्माघातावर लाभदायी ठरतोय 'सब्जा'

उष्माघातावर लाभदायी ठरतोय ‘सब्जा’

Subscribe

चविला गोड आणि शरिरातील उष्णता कमी करून शरिराला थंडावा देणारा सब्जा हा आरोग्यासाठी लाभदायक ठरतो. तसेच उन्हाळ्याच्या समस्यांवर सब्जा हा एक रामबाण उपाय आहे.

कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. तसेच हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजार देखील उद्भवत आहेत. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे जीव अगदी हैराण होतो. त्याचप्रमाणे बऱ्याच व्यक्तींना भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, ऊन बाधण्याचे प्रमाणे वाढते अशा अनेक समस्या निर्माण होतात. या सर्व समस्यांवर सब्जा हा एक रामबाण उपाय आहे.

उष्णता कमी करते

उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी सब्जाचे पेय खूप फायदेशीर ठरते. सब्जा हा थंड असल्याने शरिरातील उष्णतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सब्जाच्या बिया पाणी, निंबू पाणी, सरबत किंवा मिल्कशेक सारख्या ड्रिंकमध्ये वापरता. यामुळे शरिरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

मधुमेह प्रकार २ साठी सब्जा बी उपयुक्त मानले जाते कारण रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी ओळखले जाते. ते आपल्या शरीराचे चयापचय कमी करतात आणि कॅर्बोहायड्रेटसचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होण्यास नियंत्रित करतात. याकरता एर ग्लास दुधात १ चमचा सब्जा मिसळून ते दुध प्यायल्याने आराम मिळतो.

वजन कमी होण्यास मदत

सब्जा बी अल्फा-लिनेलेनिक अॅसिड (एएलए) नी समृद्ध असतात. या अॅसिडमुळे शरीरातील चरबीचे चयापचय वाढण्यास मदत होते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे अनावश्यक भूक लागत नाही. त्यामुळे हा सब्जा दही किंवा फ्रुट सलाड मध्ये टाकून खाऊ शकता.

- Advertisement -

बद्धकोष्ठतेवर आराम मिळतो

सब्जा बी हे आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते. झोपायला जाण्यापूर्वी एक ग्लास दुधाबरोबर काही सब्जाचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सब्जा बीमध्ये एक तेल असत जे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधून गॅस कमी करत त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होते.

अॅसिडिटी दूर होण्यास मदत

सब्जा बी पोटातील जळजळ कमी करतात आणि आपल्या शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतात. तसेच शरिरातील एचसीएलचा आम्ल प्रभाव नाहीसा करुन आराम मिळतो. यामुळे अॅसिडिटी देखील दूर होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -