घरलाईफस्टाईलसाबुदाणा पराठा

साबुदाणा पराठा

Subscribe

उपवास म्हटलं कि साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, वरीचा भात , शेंगदाण्याची आमटी आणि बटाट्याची भाजी नाहीतर शिंगाड्याचे थालीपीठ किंवा पुरी. हे ठरलेले मेनू असतात. पण आज आम्ही तुम्हांला उपवासाचा पराठा या हटके मेनूबद्दल सांगणार आहोत.

साहीत्य- १ कप साबुदाणा, २ उकडललेले बटाटे, अर्धा चमचा जिरे पावडर, पाव वाटी शेंगदाणे, अर्धा चमचा आल्याचा किस, पाव वाटी बारीक चिरलेली कोथंबिर, १ लहान चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा पीठी साखर, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तेल.

- Advertisement -

कृती- सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ घुऊन घ्यावा. नंतर अंदाजित पाण्यात दोन ते तीन तास भिजवत ठेवावा. त्यानंतर बटाटा कुस्करून घ्यावा. साबुदाणा भिजल्यानंतर बटाटा त्यात टाकावा व दोन्ही मिश्रण एकजीव करावे. नंतर त्यात जीरा पावडर, शेंगदाणे, आलं, कोथिंबिर, लिंबाचा रस, पीठी साखर टाकावी. हे सर्व मिश्रण एकजीव मळून घ्यावे.

त्यानंतर या मिश्रणाचे गोळे करावेत. दोन्ही हातांच्या तळव्याला तेल लावावे. भाकरी ज्याप्रकारे हातात धापतात. त्याप्रमाणे त्याला गोल आकार द्यावा. नंतर मंद आचेवर खरपूस भाजावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -