घरलाईफस्टाईलब्लाऊज शिवताना...

ब्लाऊज शिवताना…

Subscribe

साडीबरोबर ब्लाऊजपीस मिळतो. त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यावा. बरेचदा त्याबरोबर फोटोसुद्धा दिलेले असतात. अशा पॅटर्नप्रमाणे छान-छान पॅटर्न व फॅन्सी ब्लाऊज शिवून घ्यावेत. मात्र याचे फिटिंग अतिशय उत्कृष्ट असेच हवे. आपण कापड आणून ब्लाऊज शिवायचे, शिवून घ्यायचे असल्यास ब्लाऊजच्या बॅकला व बाह्यांना साडीतले वा साडीतल्यासारखे काठ लावावे/एम्ब्रॉयडरी करावी.

* रंग-संगती ही कॉन्ट्रास्टकडे अधिक झुकते माप देऊन असावी. यावेळी परफेक्ट मॅचिंग नसले तरी हरकत नाही.

- Advertisement -

* रेडिमेड ब्लाऊजची चलती वाढतेय. होजियरी, लायक्रामध्ये फिटिंगही उत्तम मिळते आणि यात कॉन्ट्रास्ट किंवा मिक्स मॅचचा म्हणजेच थोडे जवळचे वा हटके मॅचिंगचा चांगला उपयोग करता येईल.

* मिक्स-मॅच वा क्लोज कॉन्ट्रास्टचा वा आऊटराइट कॉन्ट्रास्टचा फायदा म्हणजे एकच ब्लाऊज दोन-तीन साड्यांवर वापरू शकतो. एका ब्लाऊजवर मॅचिंग, दुसर्‍यावर क्लोज कॉन्ट्रास्ट तर तिसर्‍या ब्लाऊजवर आऊटराइट कॉन्ट्रास्ट.

- Advertisement -

ब्लाऊजचे आधुनिक पॅटर्न-
पॅटर्न म्हणाल तर नेकलाइन हाय नेकपासून डीप/लो कट्सपर्यंत सर्व काही पॅटर्न आहेत. बाह्यांमध्ये नाविन्य हवं असेल तर स्लिव्हलेस ते फुलस्लिव्हलेजपर्यंत फुल रेंज आहे.

फिटिंग पॅटर्न पाहताना कटोरी किंवा साधा पॅटर्न आहेच; पण त्याचबरोबर प्रिन्सेस कट, चोलीसारख्या स्टाईल्स एकदम इन आहेत. अर्थात हे सर्व लग्न, पार्टी वा कॅज्युअल वेअरसाठी वापरण्याजोगे आहेत. रोजच्या ऑफिस वेअरसाठी मात्र जास्त गॉडी डिझाइन असलेले ब्लाऊज वापरू नयेत.

ऑफिस वेअर ब्लाऊज-
फॉर्मल/ऑफिस वेअरला मात्र ब्लाऊज थोडे डिस्क्रीट किंवा सोबरच योग्य. म्हणजे कॉन्ट्रास्ट जरूर करता येईल; पण शक्यतो आऊटराइट नको, क्लोज कॉन्ट्रास्ट ठेवावा. तसेच रंगसंगतीत पण क्लोज कॉन्ट्रास्ट चांगला वा काठ/एम्ब्रॉयडरी ही सुंदर व नाजूक असावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -