मैदा खाताय? सावधान!

मैद्याचे पदार्थ खाताय? मग होणारे ‘हे’ दुष्परिणाम नक्की वाचा

side effects of eating wheat flour food
मैदा खाताय? सावधान!

केक, बिस्कीट, ब्रेड, खारी, बटर असे एकना अनेक चविष्ट पदार्थ सर्वांनाच आवडतात. मात्र, याचा अतिरेक केल्यास त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही मैद्याचे अतिप्रमाणात सेवन करत असाल तर आताच सावध व्हा.

लठ्ठपणा वाढवतो

मैद्याचे जास्त आणि वारंवार पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते. यामुळे अंगी लठ्ठपणा येतो. इतकेच नाही, तर यामुळे कोलेस्टरॉलचे प्रमाणही वाढते. त्यामुळे मैद्याचे सेवन करणे शक्यतो टाळावे.

पोटासाठी वाईट

मैद्यात फायबर नसल्याने पोट नीट साफ होत नाही. त्यामुळे मैद्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने पोटाच्या समस्या उद्भवतात.

प्रोटिनची कमतरता

मैद्यात ग्लूटन असतं. ते फूड अॅलर्जी तयार करतं. ग्लूटन जेवणाला लवचिक करून त्याला मऊ टेक्स्चर देतो. त्याचे दुष्परिणाम होतात. तेच गव्हाच्या पिठात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असतं. मैद्यात या दोन्ही बाबी नसतात.

हाडं कमकुवत होतात

मैदा तयार करताना यातील प्रोटिन काढलं जातं. परिणामी, मैदा अॅसिडिक होतो. त्याचा परिणाम हाडांवर होतो. हाडांतील कॅल्शियम मैदा शोषून घेतो. त्यामुळे हाडं कमकुवत होतात.

हृदयाचा त्रास

रक्तातील साखर वाढते, तेव्हा रक्तात ग्लुकोज गोळा होऊ लागतं. यामुळे शरीरात केमिकल रिअॅक्शन होते आणि कॅटरॅक्टपासून हृदयाचा त्रास ओढावू शकतो.