घरलाईफस्टाईलसतत बसून काम करणाऱ्यांवर ओढावू शकतो मृत्यू!

सतत बसून काम करणाऱ्यांवर ओढावू शकतो मृत्यू!

Subscribe

काम करताना दरोरोज आठ ते नऊ बसून काम केल्याने भविष्यात विविध आजार बळावण्याची शक्यता

सध्या सर्वच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून काम करण्याचे प्रमाण अधिक असते. काम करताना दरोरोज आठ ते नऊ बसून काम केल्याने भविष्यात विविध आजार बळावण्याची शक्यता असते. आजकाल बरेच जण दिवसाचे नऊ ते दहा तास कार्यालयात बसून घालवतात. कॉम्प्युटरसमोर बसून सलग काम केल्याने डोळे, मान, पाठ यासारख्या अवयवांवर परिणाम होतोच. त्याशिवाय आता मृत्यूचा धोकाही समोर आला आहे. दिवसातून साडेनऊ तास बसून राहिल्यास मध्यमवयीन आणि वयस्कर व्यक्तींमध्ये मृत्यू लवकर होण्याची जोखीम वाढते, असा निष्कर्ष ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकामध्ये (British Medical Journal – BMJ) प्रकाशित केलेल्या संशोधनात्मक अध्ययनात काढण्यात आला आहे.

- Advertisement -

याच जीवनशैलीमुळे आठ ते नऊ बसून काम केल्याने लवकर मृत्यू ओढावण्याची शक्यता असते. मात्र, शारीरिक हालचाली केल्यास लवकर मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. मात्र बैठं काम करणाऱ्यांना दुसरा मार्ग नाही आणि अशाच व्यक्तींसाठी बैठ्या जीवनशैलीमुळे लवकर मृत्यू ओढावण्याचा धोका कमी करता येऊ शकतो, तेही फक्त शारीरिक हालचालीने. या संशोधनात्मक अध्ययनात दररोज २४ मिनिटं गतीने चालणं शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याचं या अध्ययनात म्हटलं आहे. निष्क्रिय किंवा कमी शारीरिक हालचाली करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक हालचाली करणाऱ्या व्यक्तींमध्ये लवकर मृत्यूची जोखीम कमी झाली आहे.

- Advertisement -

आरोग्यपूर्ण राहण्यासाठी नेमकं किती वेळ शारीरिक हालचाल करण्यात यावी, हे अस्पष्ट जरी असलं तरी कोणत्या वयात शारीरिक हालचाली जास्त कराव्यात, त्याची तीव्रता किती असावी, याबाबतच कोणतेही मापदंड नाहीत.

अर्धा तास बसून त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या आणि कितीही कालावधीसाठी शारीरिक हालचाली केल्यानं लवकर मृत्यूचा धोका ३५ टक्क्यांनी कमी होतो. अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजीमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सलग बसल्यानंतर ३० मिनिटांनी उठून हलकी अशी शारीरिक कार्य केल्यास मृत्यूचा धोका १७ टक्क्यांनी कमी होतो. तर जास्त शारीरिक कार्य केल्यास ३४ टक्के होतं. फक्त एक किंवा २ मिनिटांचे कार्यही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

त्यामुळे जरी तुमचं काम बैठं असेल, तरी अर्ध्या तासानं ब्रेक घ्या आणि शारीरिक हालचाल करा, जेणेकरून बैठ्या कामाचे दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -