कॉम्प्युटरसमोर सतत बसून काम केल्याने व्हाल लठ्ठ

mumbai

सध्या सर्वच कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून काम करण्याचे प्रमाण अधिक असते. काम करताना दरोरोज आठ ते नऊ बसून काम केल्याने भविष्यात विविध आजार बळावण्याची शक्यता असते. आजकाल बरेच जण दिवसाचे नऊ ते दहा तास कार्यालयात बसून घालवतात. साधारण या १० तास काम करणाऱ्यांपैकी कॉम्प्यूटर समोर बसून काम करणाऱ्या नोकरदार व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. या बसून काम करण्याच्या सवयीमुळे भारतातील ६३ टक्के कर्मचाऱ्यांना लठ्ठपणा या समस्येशी सामना करावा लागत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

हे लठ्ठपणाशी संबंधित असणारे सर्वेक्षण नुकतेच ‘HealthifyMe’या एका फिटनेस अॅपने भारतात केले आहे. या केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील अधिकाधिक कर्मचारी हे कंम्प्यूटर समोर बसूनच आपले ऑफिसचे काम करतात. या कामामुळेच ते लठ्ठपणाच्या आजाराने ग्रस्त असून ६३ टक्के लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. १२ महिन्यातील केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील ६३ टक्के लोक लठ्ठपणाने ग्रस्त (Indian employees are overweight) असून त्यांचा बीएमआय हा २३ आहे. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, निरोगी माणसाचा बीएमआय हा १८.५ ते २४.९ असणे आवश्यक आहे. तर २५ ते ३० मध्ये बीएमआय असणे हे लठ्ठपणाचे लक्षण समजले जाते.

ही आहेत लठ्ठपणाची कारणं

  • ऑफिसमध्ये तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून राहणे.
  • भूक लागल्यानंतर पिझ्झा, बर्गर यासारखे फास्टफूड खाणे.
  • जेवण झाल्यानंतर चालायला किंवा फिरायला न जाता झोपणे.
  • सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर औषधांचे अतिसेवन करणे.
  • योगा आणि व्यायाम न करणे.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी करा हे उपाय

भिजवलेले चणे फायदेशीर असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, आर्द्रता, फॅट, फायबर, कॅल्शियम, आर्यन व्हिटॅमिन्स असतात. त्यामुळे रक्त स्वच्छ होते. यामुळे शरीराची सुंदरता वाढते. इतकेच नव्हे तर मेंदूही तल्लख होतो. जर तुम्ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी धडपड करीत असाल तर सकाळी न्याहारीत रोज चणे घ्यावे.

जास्त कार्बोहायेड्रेट असणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायेड्रेट असते. यामुळे चरबी वाढते. फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाण्यापेक्षा गहू, सोयाबीन आणि हरभरे मिश्रित पिठाची पोळी लठ्ठ माणसांसाठी फायदेशीर ठरते.

लठ्ठपणा तसेच चरबी कमी करण्यासाठी दररोज पत्ताकोबीचे ज्यूस पिणे फायदेशीर ठरते. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म योग्य राहण्यास मदत होते.


सतत बसून काम करणाऱ्यांवर ओढावू शकतो मृत्यू!