घरलाईफस्टाईलहिवाळ्यात करा 'या' पदार्थांचे सेवन

हिवाळ्यात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Subscribe

दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. हिवाळ्यात त्वचेचे आरोग्य सांभाळणे गरजेचे असते. या ऋतूमध्ये त्वचा कोरडी पडण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. यावेळी त्वचेला केवळ विविध कंपन्यांचे क्रीम, लोशन्स लावणेच पुरेसे ठरत नाही. या दिवसात त्वचेच्या आरोग्यासाठी आहारात काही महत्त्वपूर्ण पदार्थांचा समावेश करावा.

दही

दह्यापासून तयार केलेला रायता आणि लस्सी तुमच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. हेच दही तुमच्या त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. दह्यामध्ये तांदळाचे पीठ किंवा चन्याचे पीठ मिसळून ते चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतील.

- Advertisement -

लिंबू

लिंबाचा रस केवळ आपल्या पोटासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. दररोज लिंबाचे पाणी पिण्यामुळे आपल्या पोटाच्या समस्या दूर होतात. तसेच, तुम्ही लिंबाचा रस पाणी किंवा ग्लिसरीनमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे चेहरा चमकदार बनतो.

- Advertisement -

टरबूज

बहुतेक लोकांना टरबूज खायला आवडते. टरबूज खाणे शरिरासाठी तसेच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. टरबूजचा रस तुम्ही चेहऱ्यावर देखील लावू शकता.

दूध

दूधाला संपूर्ण आहार म्हणतात. दररोज किमान दोन ग्लास दूध प्यायला पाहिजे. तुम्ही सकाळी आणि रात्री एक-एक ग्लास दूध पिऊ शकता. चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यामुळे चेहरा मऊ होतो.

सफरचंद

जेवणात दररोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे. तसेच, तुम्ही सफरचंदाचा रस चेहऱ्यावर लावू शकता. सफरचंदापासून व्हिनेगर देखील तयार करतात. सफरचंदाचा रस चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -