घरलाईफस्टाईलया उपायाने 'अॅसिडीटी' पळवा

या उपायाने ‘अॅसिडीटी’ पळवा

Subscribe

हे उपाय केल्याने दूर होते 'अॅसिडीटी'

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात. या बदलत राहणाऱ्या वेळांमुळे लहांनपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच अॅसिडीटीचा त्रास उद्भवतो. अशावेळी नेमके काय करावे कळत नाही. मात्र काही घरगुती उपाय केल्यास अॅसिडीटीचा त्रास चटकन दूर होतो.

ताक

अॅसिडीटी आणि छातीत जळजळ झाल्यास ताक हा त्यावर एक रामबाण उपाय आहे. ताकात लॅक्टिक अॅसिड असल्याने अपचनाचा त्रास दूर होण्यास मदत होते.

- Advertisement -

पुदीना

पुदीना एक औषधी वनस्पती आहे. पुदीन्यामध्ये नैसर्गिक कूलिंग एजेंट असतात. त्यामुळे पोटातील अॅसिड कमी होऊन पचनतंत्र मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे अॅसिडीटी झाल्यास पुदीन्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

आवळा

आवळ्यात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने अॅसिडीटी झाल्यास आवळ्याचे सेवन करावे. सतत अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास दररोज एक चमचा आवळा पावडर घेतल्यास आराम मिळतो.

- Advertisement -

नारळ पाणी

नारळाचे पाणी हा अॅसिडीटी आणि गॅस झाल्यास त्यावर एक चांगला उपाय आहे. नारळाच्या पाण्याच्या सेवनाने अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते.

लवंग

लवंग एक मसाल्यातील पदार्थ आहे. मात्र हा पदार्थ अॅसिडीटीची समस्या दूर करण्यास मदत करतो. लवंग चगळल्याने किंवा लवंग मधासोबत खाल्लायने अॅसिडीची समस्या दूर होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -