घरलाईफस्टाईलहे केल्याने दूर होतो पित्ताचा त्रास

हे केल्याने दूर होतो पित्ताचा त्रास

Subscribe

हे उपाय केल्याने पित्ताचा त्रास होतो दूर

पित्ताचा सर्वाधिक त्रास हा उन्हाळ्यात होतो. पित्ताच्या त्रासाने डोकं दुखणे, उलट्या होणे, छातीत जळजळ होणे, डोक्याला ठणके बसणे असे अनेक त्रास होतात. यामुळे सतत असह्य वाटू लागते. मात्र यावर काही घरगुती उपाय केल्यास पित्ताचा त्रास दूर होतो.

banana

केळ

केळ हे पित्तावर एक रामबाण उपाय आहे. पिकलेले केळे खाल्ल्याने आराम मिळतो. केळ्यामधील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते. यामुळे पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

- Advertisement -

Tulasi

तुळस

तुळस ही औषधी वनस्पती असल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. पित्त झालेल्या व्यक्तींने चार ते पाच तुळशीची पाने चावून खाल्ल्यास आराम मिळतो.

- Advertisement -

solution for acidity

दूध

पित्त झालेल्या व्यक्तीने साखर न घातलेले थंडगार दूध प्यायल्याने फायदा होतो. दूध हे पित्तशामक असल्याने पित्त कमी होण्यास मदत होते. त्यामुळे पित्त झाल्यासारखे वाटल्यास दुधामध्ये साजूक तूप घालून ते दूध प्यायल्याने आराम मिळतो.

irregular periods solutions dill

बडीशेप

बडीशेप देखील पित्तावर एक रामबाण उपाय आहे. बडीशेपमधील अँटी अल्सर घटक पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर करते. त्यासोबत बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ देखील कमी होण्यास मदत होते.

cumin

जिर

जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरातील गॅसचे विकार दूर होण्यास मदत होते. जिऱ्याच्या सेवनामुळे पचन सुधारते आणि पित्त देखील होत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -