न्यूड मेकअप लूकसाठी काही टिप्स

Mumbai

न्यूड मेकअप लूकचा सध्या खूपच वापर केला जातो. यासाठी ब्लॅक मस्कराचा वापर करा. आपल्या त्वचेला सूट होईल असा नैसर्गिक रंग आणि गुलाबी रंगाच्या लिप कलरचा वापर करा. आकर्षक दिसण्यासाठी न्यूड मेकअप लूकसाठी कोणत्या टिप्सचा वापर केला पाहिजे ते जाणून घ्या….

– आपल्या डोळ्यांना नॅचरल लूक देण्यासाठी पापण्यांना ब्लॅक मस्करा लावा आणि केस कुरळे करा.
– डोळ्यावरच्या आतील कोपर्‍यापर्यंत काजळ लावा. त्यामुळे पापण्या सुंदर आणि आकर्षक दिसतील.
– गालावर नॅचरल चमक येण्यासाठी चीकबोन्सला हायलाइट करा. सध्या न्यूड मेकअप लूकसाठी आपल्या त्वचेला सूट         होईल अशा नॅचरल शेडची निवड करा.
– यासाठी हलक्या रंगाचा वापर करा. चेहरा चमकण्यासाठी ओठांना हलक्या गुलाबी रंगाची पिंक शेडची लिपस्टीक लावून     त्यावर शाईन येण्यासाठी लिप ग्लॉसचा वापर करा. त्यामुळे अजूनच आकर्षक लूक येईल.
– न्यूड मेकअप लूकसाठी एकाच रंगाचे वेगवेगळ्या शेड्सचा वापर करा.
– न्यूड शेड्स लावण्याआधी लाईट बेस लावा आणि आवश्यक असल्यास हलक्या हातांनी लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट         पावडर लावा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here