* गरबा रात्री उशिरापर्यंत चालत असतो. यासाठी या दिवसातही आठ तास संपूर्ण झोप घ्यावी.
* जर रात्री उशिरापर्यंत झोपत असाल तर दिवसा झोप पूर्ण करावी.
- Advertisement -
* गरबा खेळताना घाम जास्त येत असतो.यासाठी दिवसभरात १२-१५ ग्लास पाणी अवश्य प्यावे.
* जर आपण रोज गरबा खेळत असाल तर .. आपल्या नेहमीच्या आहारात ३००-४०० कॅलरिज जास्त घ्याव्यात.
- Advertisement -
* सकाळी १०-११ दरम्यान ज्यामध्ये कॅलरिज जास्त असतात अशा फळांचा रस घ्यावा.
* दुपारच्या जेवणात २ चपात्या, भाजी,दही, सॅलड व एखादा गोड पदार्थ घ्यावा.
* संध्याकाळी मिल्क शेक, फळांचा ज्यूस किंवा शहाळ्याचे पाणी अवश्य प्यावे.
* उपवास असेल तर गरबा खेळायला जाण्याच्या २-३ तास आधी उकडलेल्या बटाट्याचा गोड शिरा. साबुदाणा खिचडी, फळे असे उपवासाचे पदार्थ भरपेट खाऊन घ्यावेत, जेणेकरुन गरबा खेळताना तुमची एनर्जी कमी पडणार नाही.