घरलाईफस्टाईललग्नसोहळ्यासाठी खास ड्रेसेस

लग्नसोहळ्यासाठी खास ड्रेसेस

Subscribe

सध्या सगळीकडेच लगीनघाई सुरू आहे. त्यामुळे आता लग्नाला काय घालायचं, मेकअप कसा करायचा, याकडे सर्व मुलींचे लक्ष वेधलेले आहे. लग्नाच्या विविध सोहळ्यांसाठी कोणता पोशाख घालावा यासाठी आमच्याकडे काही टिप्स आहेत.

इंडो-वेस्टर्न

आजकल खूपच ट्रेंडींग आहे ते म्हणजे इंडो-वेस्टर्न आउटफिट्स. एक लाँग गोल्डन एम्ब्रॉयडरी प्लाझो आणि त्यावर जॅकेट्स किंवा प्लेन शर्ट्स देखील तुम्ही घालू शकता. किंवा एक सिम्पल प्लाझो आणि लाँग फ्लानेल पॅन्ट्स, त्यावर ट्रेडिशनल ब्लाऊज खूप उठून दिसतो. मेक-अप साधा आणि सिम्पल ठेवावा. कारण येथे आपला आऊटफिटच सर्व काही बोलून जातो.

शिअर पॅटर्न

हल्ली ट्रेन्डींग असणारे कापड म्हणजे शिअर. एक प्लेन स्कर्ट किंवा डिजायनर लेहेंगा, त्यावर शिअर ब्लाऊज खूपच उठून दिसतो. शिअर प्रिंट ब्लाऊज आणि त्यावर एम्ब्रॉयडरी असलेली डिजाइन सध्या ट्रेन्डींग आहे. केस बांधलेले ठेवले तर हा आऊटफिट उठून दिसतो.

- Advertisement -

फ्लॉरल प्रिंट

फ्लॉरल प्रिंट सध्या ट्रेन्डमध्ये आहे. फ्लॉरल स्कर्ट, फ्लॉरल लेहेंगा, फुलांचे प्रिंट असलेले ब्लाऊज तुमच्या ड्रेसला एक फ्रेश लुक देतात. सभ्यसाचीचा फ्लॉरल लेहेंगा आणि तो ओवरऑल लूक खूप सुंदर आहे. फुलांमुळे एक नॅचरल आणि रिफ्रेशिंग लूक येतो.

फ्रन्ट कट ड्रेस

समोरून कट असलेला ड्रेस आणि त्याखाली लाँग घेर असलेला स्कर्ट खुलून दिसतो. फ्रन्ट कट असल्यामुळे शेप उठून दिसतो. खालच्या लेहेंग्याची डिजाइन सुध्दा खुलून येते.

- Advertisement -

ऑफ-शोल्डर आणि फ्रन्ट कट ब्लाऊज

ऑफ शोल्डर ब्लाऊज आपल्या ड्रेसला एक मॉडर्न फील देतात. येथे ब्लाऊज अख्ख्या आऊटफिटचा हायलाईट असतो. खाली स्कर्ट, लेहेंगा किंवा प्लाझो घालू शकतो. एका धोतर किंवा पॅन्ट्ससोबत ही हा ब्लाऊज घालू शकतो.
फ्रन्ट कट ब्लाउज सध्या ट्रेन्डींग आहे. कॉलर बोन आणि फ्लॅट टमी, तुमचा फिट लूक तुम्हाला फ्लॉन्ट करायचा असेल तर तुमच्यासाठी हे उत्तम आहे.मनिष मल्होत्राचा लेहेंगा आणि त्यावरील एकदम सुंदर डिटेलिंग खूप उठून दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -