घरलाईफस्टाईलखमंग 'पालक भजी'

खमंग ‘पालक भजी’

Subscribe

खमंग 'पालकाची भजी'ची पाककृती.

सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. मस्त रंगदार पाऊस आणि त्यासोबत छान चमचमीतगरमागरम आणि खुशखुशीत काहीतरी खावेसे वाटतेअशावेळी जर गरमागरम पालकची भजी आणि त्यसोबत वाफाळलेला चहातुमच्याही तोंडाला पाणी सुटलनाचला तर पाहुया खमंग पालकच्या भजीची पाककृती.

साहित्य

२ ते अडीच कप भरडसर चिरलेली पालकाची पाने
/४ कप कांदा, उभे पातळ काप
६ ते ७ टेस्पून बेसन
१ टेस्पून तांदूळ पिठ
/२ टिस्पून आलेलसूण पेस्ट
५ ते ७ कढीपत्त्याची पाने, बारीक चिरून
१ टिस्पून तिळ
१ टिस्पून कसूरी मेथी
/२ टेस्पून लाल तिखट किंवा गरजेनुसार
/४ टिस्पून हळद
चिमूटभर खायचा सोडा
चवीपुरते मिठ
२ ते ३ टेस्पून पाणी
तेल

- Advertisement -

कृती 

सर्वप्रथम मोठ्या वाडग्यात चिरलेला पालक, कांदा आणि मिठ घालून मिक्स करावे. १० मिनीटे तसेच ठेवावे म्हणजे कांद्याला थोडे पाणी सुटेल. नंतर त्यावर प्रथम एकूण बेसनपैकी ४ टेस्पून बेसन आणि तांदूळ पिठ पेरावे. १ टिस्पून तेल कडकडीत गरम करून पिठावर घालावे. २ मिनीटांनी हलकेच चमच्याने मिक्स करावे. अंदाज घेऊन उरलेले बेसनही घालावे. आता उरलेले जिन्नसही घालावेत. (आलेलसूण पेस्ट, कसूरी मेथी, तिळ, लाल तिखट, हळद, सोडा, आणि थोडे मिठ) सर्व निट मिक्स करा. लागल्यास अगदी थोडे पाणी घाला आणि चिकटसर असा गोळा तयार करा. त्यानंतर भजी तळण्यासाठी कढईत तेल तापवा आणि आच मिडीयमहायवर ठेवा. छोटी छोटी बोंडं, गोल्डन ब्राऊन आणि कुरकूरीत होईस्तोवर तळा. तेल टिपण्यासाठी टिश्यु पेपरवर काढा. गरमा गरम भजी टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा लसणीच्या तिखटाबरोबर सर्व्ह करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -