दूध नासले तर फेकून देऊ नका ‘हे’ पदार्थ करा

नासलेल्या दुधाचे पदार्थ.

Mumbai
spoiled milk healthy dishes
नासलेल्या दुधाचे पदार्थ.

बऱ्याचदा अचानक दूध गरम करताना नासते, अशावेळी काय करावे असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो आणि मग त्यांची चिडचिड होते. मात्र, काळजी करु नका आणि दूध नासले तर ते फेकून देखील देऊ नका. कारण त्या नासलेल्या दुधापासून तुम्ही निरनिराळे पदार्थ करु शकता. चला तर पाहूया काय काय करता येईल.

स्विट खवा

नासलेले दूध सर्वप्रथम गाळून घ्या. त्या दुधातील पाणी आणि ते नासलेले दूध वेगळे करा. त्यानंतर ते पाणी टाकून न देता तसेच ठेवा. उरलेल्या दुधाच्या मिश्रणात चवीनुसार साखर घालून ते पुन्हा चांगले गरम करा. साखर विरघळल्यानंतर छान आणि मस्त असा खवा तयार होतो. तो खाण्यास देखील छान लागतो.

पनीर

नासलेल्या दुधातील पाणी गाळून घेऊन ते दूध एका सुती कापडात घट्ट बांधून ते एका ठिकाणी लटकत ठेवा. एक दिवस पाणी चांगले गाळून झाले की ते घट्ट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा, अशाप्रकारे त्याचे तुम्ही मस्त आणि लुसलुशीत पनीर तयार करु शकता.

फाटलेल्या दुधाचे पाणी

आता उरलेल्या पाण्याचे काय करावे हा विचार तुम्हाला पडला असेल तर अजिबात विचार न करता हे पाणी तुम्ही गव्हाचे पीठ मळताना त्या पाण्याचा वापर करावा. यामुळे पोळ्या मऊ आणि लुसलुशीत होण्यास मदत होते.

भाजीत करताना वापरा

एखादी रस्स्यावाली भाजी करत असाल तर त्या भाजीमध्ये हे पाणी तुम्ही वापरु शकता.

पराठे बनवा

या पाण्याचा तुम्ही पराठे बनवताना देखील वापर करु शकता. गव्हाचे पीठ, बटाटा, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर एकत्र करुन घरच्या घरी नाश्ता करता तुम्ही पराठे बनवू शकता.