घरलाईफस्टाईलभूक आणि रागाचा काहीही संबंध नाही! संशोधनात झालं सिद्ध!

भूक आणि रागाचा काहीही संबंध नाही! संशोधनात झालं सिद्ध!

Subscribe

भूक लागणं हा माणसाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. भूक ही अशी गोष्ट आहे जी कुणाला, कधीही आणि कुठेही अगदी सहज लागू शकते. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की, जास्त राग आला की जास्त भूक लागते अथवा खूप भूक लागली असल्यास रागही अधिक येतो. मात्र शास्त्रीयदृष्ट्या राग आणि भूक यामध्ये काही परस्पर संबंध नाही.

याउलट शास्त्रज्ञांच्या मते, भूक लागणं ही खरी व प्रामाणिक भावना आहे. त्यांच्या मते, भूक ही माणसातील पूर्णत: नैसर्गिक भावना आहे. जेव्हा जेव्हा आपल्या शरीराला अन्नाची गरज भासते, त्या-त्या वेळी ही भावना सहजरित्या व्यक्त केली जाते. त्यामुळे ‘भूक लागलीये’ ही भावना व्यक्त करण्यासाठी, माणसाला कुठल्याही ठराविक स्थळाचं वा वेळेचं बंधन लागू होत नाही.

- Advertisement -

लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये, पोषण व आहारातील पथ्य या विषयात तज्ज्ञ असलेल्या प्रोफेसर- सोफी मेडलिन सागंतात की ”राग आणि भूक यामध्ये तसा काहीच संबध नाही. मात्र सोशल मीडियाच्या दुनियेत अँगरी+हंगर = हँगरी हा शब्द प्रचलित झाला आहे. बीबीसी रेडिओ ४ ला दिलेल्या मुलाखतीत सोफी यांनी हे मत मांडलं. सोफी सांगतात की, ”भूक लागणं किंवा राग येणं या दोन्ही प्रक्रिया जेव्हा घडतात, तेव्हा आपल्या शरीरात होणारे रासायनिक बदल, हे हार्मोन्सद्वारे मेंदूपर्यंत साधारण एकाच प्रकारच्या संवेदना पोहोचवतात. त्यामुळे मेंदूकडूनही कृती करण्यासाठी एकाच पद्धतीचे इंस्टंट आदेश दिले जातात. परिणामत: माणूस राग आणि भूक या दोन्ही तेवढ्याच तीव्रतेने व्यक्त करतो.

गमतीचा भाग म्हणजे, अँगरी आणि हंगर हे शब्द एकत्र करुन तयार करण्यात आलेला ‘हँगरी’ या शब्दाचा, काही महिन्यांपूर्वीच ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये अधिकृतरित्या सहभाग करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -