घरलाईफस्टाईलस्टफ पनीर पराठा

स्टफ पनीर पराठा

Subscribe

साहित्य: 

स्टफिंगसाठी-

* 2 कप किसलेले पनीर
* 3-4 हिरव्या मिरच्या, एकदम बारीक चिरून किंवा पेस्ट करून
*1-4 कप कोथिंबीर, बारीक चिरून
*1-2 टिस्पून जिरेपूड, 1 टिस्पून धनेपूड, 1-2 टिस्पून आमचूर पावडर, 1 टिस्पून किसलेले आले
*चवीपुरते मीठ

आवरणासाठी-

*3-4 कप मैदा
*1 कप गव्हाचे पीठ
*1-4 टिस्पून जिरे, 1-4 टिस्पून हळद, 1-4 टिस्पून लाल तिखट
*1-4 कप दही
*गरजेनुसार पाणी
*2 टिस्पून तेल
*2 टिस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली
*1-2 टिस्पून मीठ

- Advertisement -

इतर साहित्य

बटर किंवा तेल पराठे भाजण्यासाठीपराठे लाटायला थोडे कोरडे पीठ

कृती –

*किसलेले पनीर एका भांड्यामध्ये घ्यावे.
*त्यात मिरची, कोथिंबीर, धणे-जिरेपूड, आमचूर, आलं आणि मीठ घालून हलक्या हाताने मिक्स करावे.
*बाहेरील कव्हरसाठी मैदा, कणिक, जिरे, हळद, लाल तिखट, दही, कोथिंबीर, तेल आणि मीठ घालून मिक्स करावे.
*गरजेनुसार पाणी घालून मध्यमसर मळून घ्यावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
*कणकेचे ६ किंवा ८ समान गोळे करावेत. मिश्रणाचेसुद्धा तितकेच समान भाग करावेत.
* कणकेचा १ गोळा तीन ते साडेतीन इंचाचा लाटून घ्यावा.
*त्याच्या मध्यभागी १ भाग मिश्रणाचा ठेवावा. सर्व बाजू एकत्र वर आणाव्यात आणि गोळा बंद करावा.
*थोड्या पिठावर लाटून तव्यावर तेल किंवा बटर टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावा आणि गरमागरम सर्व्ह करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -