घरलाईफस्टाईलसाठ्याची डाएट शुगर फ्री करंजी

साठ्याची डाएट शुगर फ्री करंजी

Subscribe

साहित्य-
मैदा -१ कप
रवा -१ चमचा
साजूक तूप – १ मोठा चमचा
दूध – १ कप
मीठ – चवीनुसार

सारणासाठी साहित्य –
तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घ्या. बदाम, काजू , अक्रोड आणि चारोळी- अर्धी वाटी
गुलकंद – २ मोठे चमचे
बारीक चिरलेला खजूर – २ मोठे चमचे (साखर वापरत नसल्यामुळे गोडव्यासाठी)
बेदाणे – १ चमचा
साजूक तूप भाजण्यासाठी
खस-खस -छोटा चमचा
टुटी – फ्रुटी – १ चमचा
जायफळ आणि वेलदोड्याची पूड -१ छोटा चमचा

- Advertisement -

साठा बनवण्यासाठी-
१ चमचा तूप आणि १ चमचा कॉर्नप्लॉवर घ्या. दोन्ही एका बाऊलमध्ये मिक्स करा. या मिश्रणाला साठा म्हणतात.याच्या वापराने करंजी खुशखुशीत होते.

कृती

* मैदा, रवा, तूप आणि चवीनुसार मीठ एकत्र मिक्स करावे आणि त्यात थोडे थोडे दुध टाकून घट्ट कणीक मळावी.

- Advertisement -

* मळलेली कणीक एका कॉटनच्या कपड्याने १ तासासाठी झाकून ठेवावी.

* गॅसवर एका पॅनमध्ये थोडे तूप टाकून सर्व ड्रायफ्रुट्स बाजून घ्यावे.

* भाजलेले सर्व ड्रायफ्रुट्स मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्यावे.

* एका बाऊलमध्ये बारीक केलेले ड्रायफ्रुट्स, बेदाणे, छोटा चमचा, खस-खस,गुलकंद,टुटी- फ्रुटी,
जायफळ – वेलदोड्याची पूड आणि खजुराचे बारीक काप मिक्स करून घ्या.

* आता भिजलेल्या कणकेचा गोळा बनवून त्याची जाडसर पोळी/चपाती लाटा.

* या पूर्ण चपातीवर तयार केलेला साठा लावा. नंतर या चपातीला रोल करा आणि त्याचे सुरळीच्या वडीसारखे काप करा.

* काप केलेली एक लाटी घेऊन ती उभीच लाटा जेणे करून करंजीला छान लेअर दिसतील.

* नंतर त्यात सारण भरून त्याला करंजीचा आकार द्या आणि वरुन थोडा तुपाचा हात फिरवून ओव्हनमध्ये बेक करा. (डाएट न करणारे आवडीप्रमाणे तळून सुद्धा घेऊ शकतात.) अशाप्रकारे खुशखुशीत डाएट करंजी तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -