घरलाईफस्टाईलउन्हाळ्यातील ‘कूल’ फॅशन

उन्हाळ्यातील ‘कूल’ फॅशन

Subscribe

उन्हाळ्याच्या दिवसात आहार, विहाराबरोबरच पेहरावावरसुद्धा लक्ष देणे गरजेचे असते. या दिवसात अगदी हलकसं, सुटसुटीत काही तरी घालून बाहेर पडावं आणि शक्य तितकी या हैरान करणार्‍या उकाड्यापासून सुटका करून घ्यावी, असे प्रत्येकाला वाटत असते. तेव्हा उन्हाळ्यात आपला पेहेराव कसा असावा याबद्दल थोडक्यात.

पलाझ्झो-
उंच असा सुटसुटीत पायघोळ असलेल्या या पॅन्टला फॅशनच्या दुनियेत पलाझ्झो पॅन्ट म्हणतात. फुलांच्या नक्षीने बहरलेल्या पलाझ्झो पॅन्ट सध्या बाजारामध्ये अधिक लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. लिनन कापडाच्या पलाझ्झो आणि वर मंद रंगसंगतीचे, एकाच रंगातले टॉप्स किंवा शर्ट्स तरुणींमध्ये लोकप्रिय होत आहेत.

- Advertisement -

स्कार्फ-
प्रदूषण आणि चटके बसवणार्‍या उन्हापासून संरक्षण म्हणून वापरले जाणारे स्कार्फ पुन्हा नव्या फॅशनमध्ये येत आहेत. वजनाला हलके आणि उन्हापासून संरक्षण करतील असे स्टोल्स आणि स्कार्फ सध्या मुलींमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. कॉटन, सिल्क, पश्मिरा, काश्मिरी सिल्क या अशा फॅब्रिक्समध्ये त्या उपलब्ध आहेत.

कॉटन जम्पसूट-
सध्या बाजारामध्ये सुटसुटीत अशा जम्पसूटची चलती आहे. टॉप आणि पॅण्टचा एकत्रित अवतार म्हणजे जम्पसूट. उन्हाळ्यामध्ये कॉटनचे जम्पसूट सर्वाधिक वापरले जातात. अशाप्रकारच्या जम्पसूटमुळे तंग जीन्सपासून सुट्टी मिळते. पुन्हा त्यावर कोणता टी-शर्ट घालू असा प्रश्नही पडत नाही.

- Advertisement -

लाँग शर्ट-
दिवसेंदिवस तापमान वाढतेय. अंगाची काहिली होतेय. अशा वेळी लाँग शर्ट हा प्रकार तरुणींच्या अधिक पसंतीचा बनत चालला आहे. सर्वसाधारण शर्ट्सपेक्षा उंचीने लांब व खालच्या बाजूला अ‍ॅपलकट (अर्धगोलाकार) असलेला हा शर्ट कॅज्युअल आणि फॉर्मल अशा दोन्हींवर शोभून दिसतो. यामध्ये लाइट ग्रे, बिस्कीट कलर, मॅन्गो कलर आदी रंग वापरले जातात.

वनपीस ड्रेसेस्-
एरवी तंग कपडे घालण्साठी प्रसिद्ध असलेल्या या तरुणी उन्हाळ्यामध्ये मात्र सैल कपडे घालणे पसंत करतात. त्यामध्ये उत्तम पर्याय म्हणजे वनपीस ड्रेस. यामध्ये काही पूर्ण बाह्यांचे तर काही स्लिव्हलेस (बाह्या नसलेले) असे काही आकर्षक वनपीस सौम्य रंगामध्ये उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -