घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात मधुमेहाचे व्यवस्थापन - भाग २

उन्हाळ्यात मधुमेहाचे व्यवस्थापन – भाग २

Subscribe

तुमच्या पायांची काळजी घ्या – अनवाणी चालणे टाळा, विशेषतः तुमची नर्व्ह डॅमेज (नसेला इजा) झाली असेल तर तुमची टोकदार वस्तूंची जाणीव होण्याची आणि गरम पृष्ठभागांची जाणीव होण्याची क्षमता कमी होते. तुम्ही कदाचित तुम्हाला लागून घ्याल आणि तुम्हाला जाणवणारही नाही. संरक्षक पादत्राणे घाला. पायाच्या जखमांवर लक्ष ठेवा. त्याचप्रमाणे तुमच्या पायाला पडलेल्या मोठ्या भेगा किंवा दोन बोटांमधील पांढर्‍या डागांवर लक्ष द्या. कारण तो अ‍ॅथलीट्स फूट असू शकतो. पायाला घाम येत असेल तर तुम्हाला अ‍ॅथलीट्स फूट किंवा इतर फंगल संसर्ग होऊ शकतो. तुमचे पाय नेहमी कोरडे ठेवा.

उन्हाळ्यात त्वचा मऊ रहावी यासाठी लोशन लावा- कारण उन्हाळ्यात तुमच्या पायाची त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. तुमच्या पायांच्या तळव्यावर लोशनचा पातळ थर लावा, पण तुमच्या पायाच्या बोटांमध्ये मात्र लावू नका. अतिरिक्त ओलाव्यामुळेसुद्धा फंगल इन्फेक्शन होऊ शकते.

- Advertisement -

तुम्ही बाहेर काम करत असाल किंवा व्यायाम करत असाल तर उन्हामुळे येणार्‍या थकव्याबद्दल सतर्क रहा. मधुमेह आणि हृदयविकारासारखे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींच्या शरीरात अतिरक्त उष्णता होण्याची शक्यता असते. भोवळ येणे किंवा बेशुद्ध पडणे, प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे, स्नायूंमध्ये गोळे येणे, त्वचा थंड किंवा चिकट होणे, डोकेदुखी, हृदयाचे ठोके जलद पडणे किंवा मळमळ या लक्षणांचा त्यात समावेश आहे. यापैकी एखादे लक्षण दिसले तर लगेचच थंड ठिकाणी जा, पाण्यासारखे पेय प्या.

अल्पोपहार करण्यास विसरू नका – हायपोग्लायसेमियाला कारणीभूत ठरणारी औषधे तुम्ही घेत असाल तर हायपोग्लायसेमियावर उपाय म्हणून फळांचा रस, कँडी, ग्लुकोज पावडर आणि काहीतरी अल्पोपहार सोबत बाळगा.

- Advertisement -

नियमित तपासणी करून घ्या – मधुमेह असलेल्या बहुतेक व्यक्तींना डायबेटिक रेटिनोपथी किंवा ग्लाउकोमासारखे आजार आधीपासून असतात. या आजारांसोबत व्यक्तींना डोळे येणे किंवा इतर संसर्गांसाठी डोळ्यांचे विकार होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक मधुमेहीने नियमितपणे डोळे तपासून घेणे हितकारक ठरते.

– डॉ. प्रदीप गाडगे, मधुमेहतज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -