घरलाईफस्टाईलउन्हाळा आला आरोग्य सांभाळा

उन्हाळा आला आरोग्य सांभाळा

Subscribe

थंडी आता निरोप घेत असून, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे या दिवसात अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे. आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसात काय खावे, काय खाऊ नये इथपासून ते पोशाख कसा असावा इथपर्यंत लहान सहान बाबींची काळजी घेतल्यास उन्हाळाही आल्हाददायी जाईल.

* उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी प्यावे. फ्रिज, कुलरमधील थंडगार पाणी प्यायल्याने घसा, दात, आतडे यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे फ्रिजमधील पाणी न पिता माठातील थंडगार पाणी प्यावे. महत्त्वाचे म्हणजे दुपारच्या वेळेस बाहेर फिरून घरी आल्यास लगेच पाणी पिऊ नये, तसेच उन्हात बाहेर फिरायला निघण्यापूर्वी पाणी पिऊन जावे. या दिवसात वाळ्याची मुळे घातलेले पाणी पिणे शरीरासाठी लाभदायी ठरते. वाळ्याच्या मुळांमध्ये उष्णता शामक गुणधर्म आढळतात. उन्हाळ्याच्या दिवसात उष्णताशामक सरबते बनविण्यास तसेच उन्हापासून आडोसा घेण्यासाठी त्याच्या मुळांचा ताट्या बनविण्यासाठी भारतात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

- Advertisement -

* फळांचे डबाबंद सरबत, कोल्डड्रींक्स, आईस्क्रिम सारखे पदार्थ टिकण्यासाठी त्यांमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यास पचनशक्तीवर परिणाम होतो. त्याचप्रमाणे त्वचाविकार जडण्याचीही भीती असते. तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसांत असे पदार्थ शक्यतो टाळावे.

* उन्हाळा म्हटले की कैरीचा मौसम. तेव्हा कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, इतर फळांचा ताजा रस, ताक, शहाळ्याचे पाणी, गुलकंद, जिर्‍याचे पाणी, गायीचे तूप आदी थंड पेयांचा आहारात समावेश करावा. त्यामुळे सूर्याच्या कडक उन्हातही आपण फ्रेश राहतो.

- Advertisement -

* या दिवसात साधा सकस आहार घ्यावा. थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा, तसेच शिळे अन्न, तळलेले पदार्थ, आंबट लोणचे, अति तिखट, खारट, कडू पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत.

* या दिवसात जळवातासारखे आजार डोके वर काढतात. त्यामुळे हातापायांना भेगा पडून रुक्ष होतात. अशावेळी हातापायांना मेहंदी लावावी.

* या दिवसात बाहेर फिरायला जाताना सोबत टोपी, स्कार्फ, गॉगल आदी वस्तू सोबत ठेवा. फिकट रंगाच्या सैलसर सुती कपड्यांचा पेहराव करणे या दिवसात आरोग्यदायी ठरते.

* अतिव्यायाम, उघड्यावरील पदार्थ, दुपारचे फिरणे उन्हाळ्याच्या दिवसांत टाळावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -