सनशाइन ब्रेकफास्ट फ्रूट सॅलड

शेफ सब्यसाची गोराई

sunshine fruit salad,
सनशाईन फ्रूट सॅलेड

साहित्य

१ किवी, सोलून, अर्धा करून कापलेला

१ नेक्टराइन, अर्धा करून, फोडून कापलेला

१५० ग्रॅम स्ट्रॉबेरी कापून

५०  ग्रॅम लाल बीरहित द्राक्षे, कापलेली

२ पुदिन्याच्या काड्या, पाने बारीक करून

५० ग्रॅम अक्रोड, साधारण कापलेले

२ टेबलस्पून ओट्स

१ टेबलस्पून किसलेले खोबरे

४ टेबलस्पून योगर्ट

कृती

१. फळे, पुदीना एकत्र करा आणि बाजूला ठेवा.

२. अक्रोड, ओट्स आणि खोबरे फॉइल लावलेल्या बेकिंग ट्रेवर ठेवा आणि टोस्ट होईपर्यंत गरम केलेल्या ग्रिलवर १-२ मिनिटे ठेवा.

३. फळे दोन ग्लासच्या तळाशी ठेवा, त्यावर योगर्ट घाला आणि मग वॉलनट क्रंबवर भुरभुरवा.