घरलाईफस्टाईल'या' पदार्थाने रोगप्रतिकारशक्ती वाढेल

‘या’ पदार्थाने रोगप्रतिकारशक्ती वाढेल

Subscribe

काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे आणि खाण्या – पिण्याच्या सवयींमुळे अनेक जण वारंवार आजारी पडतात. मग सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यांसारख्या सामान्य समस्या उद्धवतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कमजोर होते. त्यामुळे आपण गंभीर आजारांचे शिकार बनतो. त्यामुळे स्वत:ची काळजी घेण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे फार महत्त्वाचे असते. मात्र, ही रोगप्रतिकारशक्ती आपण आपल्या खाण्यातून देखील वाढवू शकतो. चला तर जाणून घेऊया असेच काही पदार्थ ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

ग्रीन टी

- Advertisement -

ग्रीन टी आणि ब्लॅक टीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा ग्रीन टीचे सेवन करावे.

लसूण

- Advertisement -

लसणामध्ये भरपूर प्रमाणात एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए आणि ई असते. त्यामुळे लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

दही

नियमित दह्याचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनशक्ती देखील सुधारते.

ओट्स

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे दररोज ओट्स खाल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

व्हिटॅमिन सी

लिंबू, आवळा, संत्री यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्यामुळे नियमित व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचे सेवन करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -