घरलाईफस्टाईलफिट राहण्यासाठी 'सूर्यनमस्कार'

फिट राहण्यासाठी ‘सूर्यनमस्कार’

Subscribe

जाणून घ्या सूर्यनमस्कार घालण्याचे फायदे

लहान वयापासून आपल्याला शाळेत सांगितले जाते की, दररोज सूर्यनमस्कार केल्यास आरोग्य उत्तम राहते. हे खरे आहे. कारण सूर्यनमस्कारमध्ये दहा योगासने एकदम करवून घेतले जातात. त्यामुळे नियमितपणे सूर्यनमस्कार केल्यास अनेकद फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सूर्यनमस्काराचे फायदे.

हृदयाची कार्यक्षमता वाढते

- Advertisement -

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना हृदयाचा त्रास होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हृदयाच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार घातल्याने हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते. यामुळे दररोज सूर्यनमस्कार घालावा.

कंबर लवचिक होते

- Advertisement -

दररोज सूर्यनमस्कार घातल्याने बाहू आणि कंबर यांचे स्नायू बळकट होतात. तसेच पाठीचा मणका आणि कंबर देखील लवचिक होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते

अनेकदा जेवणाच्या वेळा या ठरलेल्या नसतात. त्यामुळे बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास होतो. अशावेळी पचनक्रिया सुधारण्यासाठी सूर्यनमस्कार घालणे अधिक फायद्याचे ठरते.

‘ड’ जीवनसत्त्व मिळते

सूर्याच्या किरणातून ‘ड’ जीवनसत्त्व शरीराला मिळते. हल्ली या जीवनसत्त्वाची कमतरता अनेकांना असते. दिवसभर वातानुकूलित गाडीतून फिरणे, वातानुकूलित कार्यालयात बसून काम करणे यात ‘ड’ जीवनसत्त्व मिळतच नाही. ते मिळवण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार घातल्यास त्याचा फायदा अधिक होतो.

स्थूलपणा

स्थूलपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सूर्यनमस्कार घालावा.

रोगप्रतिकारशक्ती वाढणे

शरीर लवचिक होणे, मेद कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती वाढणे, दमश्वास वाढणे आणि भूक आटोक्यात येणे यासाठी सूर्यनमस्कार चांगले.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -