स्वीट रेसिपी : शिंगाड्याच्या पीठाचे लाडू

शिंगाड्याच्या पीठाचे लाडू

sweet recipe shingada ladoo
स्वीट रेसिपी : शिंगाड्याच्या पीठाचे लाडू

बऱ्याचदा आपण बेसन आणि रव्याचे लाडू करतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला शिंगाड्याच्या पीठाचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहोत.

साहित्य

  • १ वाटी शिंगाडा पीठ
  • अर्धी वाटी दाण्याचे कूट
  • ७-८ चमचे साजूक तूप
  • पाऊण वाटी पीठीसाखर

कृती

कढईत शिंगाडा पीठ आणि साजूक तूप घेऊन मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजणे. भाजल्यावर गॅस बंद करून त्यात दाण्याचे कूट आणि साखर घालून चांगले ढवळून घ्या. नंतर कोमट असताना लाडू वळून घ्या.