घरलाईफस्टाईलगुडघ्याचा संधिवात असल्यास प्रवासात घ्या काळजी

गुडघ्याचा संधिवात असल्यास प्रवासात घ्या काळजी

Subscribe

गुडघ्याचा संधिवात असणार्‍या व्यक्तीने प्रवास करणे खरेतर कठीण असते, कारण प्रवासादरम्यान सांध्यांवर येणारा भार अधिक त्रासदायक ठरू शकतो. साधारणपणे वाढत्या वयानुसार कार्टिलेजची क्षमता कमी होते, झीज वाढत जाते. त्यामुळे संधिवाताचे प्रमाण वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक आहे. सांधे दुखणे, सांध्यांची हालचाल योग्यरितीने न होणे, तसेच चालताना, वाकताना, उठताना, बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे यामध्ये वेदना निर्माण होतात. ही सर्व लक्षणे उतारवयामध्ये वेदना निर्माण करणारी आहेत.

प्रवासादरम्यान अशी घ्या काळजी

- Advertisement -

सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना चढताना अथवा उतरताना गुडघ्यांवर अतिरिक्त भार येणार नाही याची काळजी घ्या
प्रवासात घाई करू नका, एका वेळी एकच पाऊल उचला प्रवासात बराच वेळ बसावे लागत असल्याने अधूनमधून उभे रहा जेणेकरून हाडांवर ताण येणार नाही. अधिक काळ एकाच जागी बसल्याने स्नायूंवर ताण येऊन त्यामुळे शक्य असेल तेव्हा उभे रहा आणि हालचाल करा जेणेकरून शारीरिक वेदनांपासून लांब राहता येईल. असे केल्याने अधिक काळ बसता येईल.

व्हीलचेअरचा वापर करा.यामुळे स्नायूंवर अधिक ताण येणार नाही. विमानप्रवास करताना आधीच व्हीलचेअर बुक करणे सोयीस्कर ठरेल.

- Advertisement -

तुमची औषधे नेहमी जवळ बाळगा. प्रवासादरम्यान औषधांचा डोस चुकविणे नुकसानकारक ठरेल त्यामुळे रोजची औषधे आपल्या जवळ बाळगणे उत्तम ठरते, टॅबलेट डोलो 650 ही पेनकिलर आपल्या सोबत ठेवल्यास अडचण येणार नाही.
आरामदायी आसनव्यवस्था निवडणे अधिक फायद्याचे ठरेल. प्रवासादरम्यान उठणे आणि बसणे सहज शक्य होईल अशी जागा निवडा. प्रवासात पाय लांब करता येतील अशी सीट निवडल्यास फायदा होईल. फ्लाईट निवडताना कमी अंतराच्या फ्लाईट्स निवडणे योग्य ठरेल.

चार चाकीने प्रवास करताना अधूनमधून ब्रेक घेणे योग्य ठरेल. यामुळे एकाच अवस्थेत न बसता अधूनमधून हालचाल करता येणे शक्य होईल आणि वेदनांपासून दूर राहणे शक्य होईल.

आरामदायी कपड्यांची निवड करा जेणेकरून प्रवासादरम्यान अडचणी येणार नाहीत. घट्ट कपडे घालणे टाळा. सैल कपड्यांमुळे शक्य तेव्हा वेदनाशामक बाम, बर्फ लावणे शक्य होईल. पायाला अराम देणार्‍या बुटांची निवड करा.

बस, ट्रेनने प्रवास करताना खूप वेळ उभे रहावे लागणार नाही याची खबरदारी घ्या. जास्त वेळ उभे राहिल्याने शरीराचा अतिरिक्त भार स्नायूंवर येऊन सांधेदुखी उद्भवू शकते.

सांधेदुखीवर लाभदायक ठरणारी साहित्ये नेहमी सोबत ठेवा. आईस पॅक, गरम पाण्याची पिशवी अशा गोष्टी नेहमी सोबत बाळगा. डॉक्टरांनी दिलेली औषधे तसेच त्यांनी दिलेल्या सूचनांचे अचूक पालन करा.

-डॉ. मितेन शेठ, अस्थिविकार आणि गुडघेविकार शल्यविशारद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -