घरलाईफस्टाईलहेअर कलरनंतर केसांची ‘अशी’ घ्या काळजी -

हेअर कलरनंतर केसांची ‘अशी’ घ्या काळजी –

Subscribe

*हेअर कलर केल्यानंतर तुमच्या स्टायलिस्टने सांगितलेला शॅम्पू वापरा. तुमच्या केसांना शॅम्पूनंतर कंडिशनर वापरायला विसरु नका.

*केसांचा रंग जास्त टिकवण्यासाठी आठवड्यातून फक्त दोनवेळा केस धुवा.

- Advertisement -

*केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करु नका. गरम पाण्याने केस गळण्याची शक्यता अधिक असते

*केस वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करत असाल तर हॉट ड्राय करु नका. कारण गरम हवेमुळे केस शुष्क होण्याची भीती असते. त्यामुळे हॉट ड्रायर टाळा

- Advertisement -

*हेअर कलरनंतर अनेकदा केसांना फाटे फुटतात. असे केस योग्यवेळी ट्रिम करा.

*केसांचा मुलायमपणा टिकवण्यासाठी महिन्यातून एकदा हेअर स्पा करा.

*जर तुम्ही पांढर्‍या केसांमुळे हेअर कलर केला असेल, तर अशा केसांना वारंवार टचअपची गरज भासते. तेव्हा दर १५ दिवसांनी केसाला कलरचा टचअप द्या.

*ग्लोबल हेअर कलरची सध्या क्रेझ आहे. शिवाय यात व्हरायटी म्हणून मल्टी कलरचा वापर होतो. अशा केसांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. अशा केसांना प्रोफेशनल स्टायलिस्टच्या सल्ल्यानेच ट्रिट करा.

*केसांना कलर केल्यानंतर हेअर कलसर्र्, स्ट्रेटनिंग करणे टाळा.

*आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावून मालिश करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -