घरलाईफस्टाईलघ्या वृद्ध पालकांची काळजी

घ्या वृद्ध पालकांची काळजी

Subscribe

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असे म्हटले जाते ते उगीच नाही. घरातील वृद्ध व्यक्ती आजाराने, व्याधीने ग्रस्त असेल, तिच्या हालचालीवर – खाण्यापिण्यावर – व्यवहारावर त्यामुळे जर मर्यादा आल्या असतील आणि त्यातून जर ती व्यक्ती अंथरुणाला खिळून असेल तर अशा परिस्थितीत घरातील वृद्धांचा स्वभाव हट्टी होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्यांना जशी औषधोपचार, शुश्रूषेची गरज असते तशी प्रेमळ स्पर्शाची, आश्वासनाचीही गरज असते. त्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालविणे, मायेचा स्पर्श, त्यांचा हात हातात घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हेही त्यांच्या स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते. ‘आपण इतरांना हवे आहोत’ ही भावना त्यांच्यासाठी मोलाची असते.

१) कोवळे ऊन आरोग्यासाठी लाभदायक असते. तेव्हा रोज थोडा वेळ तरी घरातील वृद्ध व्यक्ती सकाळ सायंकाळच्या कोवळ्या उन्हात बसतील असे पहावे.

- Advertisement -

२) वृद्धापकाळात घरातील वृद्धांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी त्यांच्या लहान सहान कामांमध्ये आपण त्यांना मदत करू शकतो. त्यांच्या केसांना कळप लावण्यापासून ते पायाची नखे काढण्यापर्यंत कामांमध्ये तुम्ही त्यांना मदत करा.

३) घरातील वृद्ध पालकांना समाजोपयोगी कामे करण्याची आवड असल्यास ती कामे करण्यास प्रोत्साहन द्या. असे केल्याने त्यांचे मनही रमते. तसेच ती कामे करताना त्यांना आनंदही प्राप्त होतो.

- Advertisement -

४) वृद्धांना आपल्या समवयस्कांशी संपर्कात राहण्यास, स्नेहीजनांच्या भेटीगाठी घडवून आणण्यास प्रोत्साहन देणे.

५) आधुनिक तंत्रज्ञानाशी व सोशल मीडियाशी त्यांची नाळ जोडणे. त्याद्वारे त्यांच्या जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्यास त्यांना मदत करणे. अर्थात या माध्यमांबद्दल त्यांना पुरेसे जागृत करून मगच!

६) हे अतिमहत्त्वाचे : वृद्धांना नित्य उपयोगी पडणारे किंवा त्यांना सेवा पुरवणार्‍या व्यक्ती / संस्थांचे नाव – संपर्क क्रमांक ठळक अक्षरात, त्यांना नजरेस पडेल अशा ठिकाणी नोंदवून ठेवणे. तसेच इमर्जन्सीच्या वेळी ज्यांच्याशी संपर्क साधायचा अशा व्यक्ती / संस्थांची नावे, फोन नंबर्स, पत्ते हे मोठ्या, ठळक अक्षरात फोनपाशी लावून ठेवणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -