घरलाईफस्टाईलफॅटी लिव्हरची घ्या काळजी

फॅटी लिव्हरची घ्या काळजी

Subscribe

व्यस्त जीवनशैली आणि अस्वस्थ आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यापैकी एक फॅटी लिव्हर आहे. त्या वेळी त्याचा उपचार न केल्यास तो गंभीर स्वरूपात येऊ शकतो. यकृत पेशींमध्ये अनावश्यक चरबी साचल्याने ही परिस्थिती उद्भवते. यामुळे यकृताला धोका पोहोचू शकतो. शक्य तितक्या लवकर त्याचे उपचार केल्यास निरोगी जीवन जगता येते.

फॅटी लिव्हर हा रोग तीन प्रकारात पहायला मिळतो. यामधील पहिला प्रकार म्हणजे स्टेटोसिस, दुसरा प्रकार म्हणजे स्टेरिएपेटायटिस यामध्ये जखम आणि सूज असलेले यकृत पहायला मिळते आणि तिसरे म्हणजे सिरोसिस.जे गंभीर आणि अपरिवर्तनीय बनते. नॉन-अल्कोहोल फॅटी यकृत रोग सुरुवातीला लक्षणे दर्शवत नाही, परंतु चरबी यकृतामध्ये जमा झाल्यानंतर पोटाचे दुखणे किंवा थकव्याची लक्षणे दिसून येऊ शकतात. जेव्हा आपल्या आहारातील चरबीचे योग्यरितीने विघटन होऊन त्याचा योग्य वापर झाला नाही, तर यकृतामध्ये चरबीची साठवण होते. आहारात जास्त साखर किंवा स्निग्ध पदार्थ आणि त्यामानाने कमी व्यायाम, हालचाल यामुळे लिव्हर फॅटी होते. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड/ इतर अंत:स्रावाची कमतरता, कोलेस्टेरॉल/ ट्रायग्लीसराइडचे रक्तातील प्रमाण वाढणे यामुळे यकृतातील चरबीचे प्रमाण वाढते.

- Advertisement -

पोटाचा घेर वाढतो, वजन सतत वाढणे, युकृताचा आकार वाढणे व सूज येणे, मळमळमळणे, भूक न लागणे, कामात उत्साह न राहणे, पायांना सूज येणे, थकवा जाणवणे, पोटात उजव्या बाजूला दुखणे आणि लठ्ठपणा अशी फॅटी लिव्हरची लक्षणे असतात. प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या असते. मधुमेहाच्या 70% ते 80% लोकांना रुग्णांना फॅटी लिव्हरचा धोका असतो.आपला लठ्ठपणा धोकादायक आहे की नाही याचे मोजमाप बॉडी, मास, इंडेक्स वरून ( B . M. I ) केले जाते. पूर्वीच्या काळात फॅटी लिव्हरची समस्या 50 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांत दिसून येत असे, पण आता हळुहळू तरुणांमध्येही या आजाराचे प्रमाण वाढत आहे.

फॅटी लिव्हर या आजाराचे प्रमाण समाजात हल्ली फारच वाढले आहे. बहुतांशी व्यक्तींमध्ये ग्रेड वन चरबीचे प्रमाण असू शकते. ज्या व्यक्ती दारू पीत नाही किंवा कमी प्रमाणात घेतात त्यांच्या यकृतात चरबीचे प्रमाण वाढले तर (Non Alcoholic Steatohepatitis)या आजाराचे निदान केले जाते. चरबीचे प्रमाण जास्त असल्यास यकृतास सूज येते. पुढे यकृतामध्ये जखमा व घट्टपणा येतो. त्यामुळे पुढे सिरोसिस होतो व कर्करोगदेखील होऊ शकतो. जगभर आजच्या काळात दारूमुळे होणार्‍या सिरेसिसपेक्षा याचे प्रमाण जास्त आहे. साधारणत: सूज आलेल्या २० टक्के रुग्णांना सिरेसिस होतो व १०-११ टक्के रुग्णांमध्ये ते मृत्यूचे कारण होते.

- Advertisement -

फॅटी लिव्हरपासून दूर राहण्यासाठी मुलांनी मैदानी खेळ खेळलेच पाहिजेत .उघड्यावरचे पदार्थ, फास्ट फूड खाणे बंद करावे, घरूनच मुलांना पोषक डबा कसा देता येईल हे पहावे.रोजचा सकाळचा नाश्ता ही सर्वांसाठी आवश्यक अशी गोष्ट आहे. नाश्ता टाळू नये. दिवसातून एक-दोन तरी फळे खावीत. रोजच्या आहारात भरपूर फायबर म्हणजे चोथा असलेले अन्न उदा. पालेभाज्या, कोंडा न काढलेली भाकरी इत्यादीचा आवर्जून समावेश करावा.रोज एक तास व्यायाम करावा. त्यात शरीराच्या प्रत्येक सांध्याची हालचाल होईल, असे पहावे. या व्यायामामुळे शरीर फीट राहते, स्थूलत्व येत नाही; शिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहते. आहार समतोल असावा – आहारात फळभाज्या, पालेभाज्या, कच्चे सॅलॅड, कोशिंबिरिचा समावेश असावा.जेवताना शांत, आनंदी मनाने जेवावे, त्यामुळे पाचकरस योग्य प्रमाणात स्रवतात व योग्य पचन होते.

फॅटी लिव्हरला प्रतिबंध घालण्यासाठी

*वजन नियंत्रित करणे
*रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे
*मद्यपान आणि धूम्रपान ताबडतोब बंद करा
*कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबावर नियंत्रण ठेवा
*पौष्टीक आणि संतुलित आहार घ्या
*नियमित व्यायाम करा
*फळे, भाज्या, बीन्स, कोंडायुक्त धान्याचा आहारात समावेश करा
*तळलेले पदार्थ आणि जंकफूड वर्ज्य करा
*आहारतज्ज्ञांकडून डाएट चार्ट तयार करून त्यानुसारच आहार घ्या
*डॉक्टरला न विचारता पेनकीलर्स किंवा कोणतेही औषध घेऊ नका .

– डॉ. अमित गुप्ते, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -