घरलाईफस्टाईलवॉशिंग मशिनची अशी घ्या काळजी

वॉशिंग मशिनची अशी घ्या काळजी

Subscribe

वॉशिंगमशिन आज प्रत्येक घरातील गृहिणीची गरज झाली आहे. आता प्रत्येकाच्याच घरात फुल्ल अ‍ॅटोमॅटिक मशिन किंवा सेमी अ‍ॅटोमॅटिक मशिन असतेच. ही मशिन दीर्घकाळ सुस्थितीत चालू रहावी यासाठी त्याची योग्य काळजी घेणेदेखील महत्वाचे आहे. जाणून घेऊया त्या विषयी.

  • वॉशिंग मशिनमध्ये असलेल्या डिटर्जंट बॉक्समध्ये सर्वात जास्त जंतू उत्पन्न होत असतात. डिटर्जंट बॉक्स दर आठवड्याला साफ करायला हवा. सर्वप्रथम त्यातिल वॉशिंग पावडर काढून घ्या आणि मग ते स्वच्छ करा. शक्य असल्यास बाहेरुन साफ करण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करावा. सफाईसाठी साधा घरगुती क्लिनरही पुरेसा आहे.
  • वॉशिंग मशिनचा फिल्टर नेहमी साफ ठेवावा. फिल्टर नियमित साफ ठेवल्याने त्यातील साचलेला मळ निघून जातो.
  • वॉशिंगमशिनच्या आतील ड्रमदेखील साफ करा. यात छोटी छोटी छिद्रे असतात. बरेच दिवस मशिन साफ न केल्यास त्यात साबणाचे/डिटर्जंटचे कण साचतात. सतत साचलेल्या डिटर्जंटमुळे ड्रमवर एक प्रकारे बुरशीसारखा थर साचू शकतो. त्यामुळे ड्रमला एक प्रकारची दुर्गंधी येते परिणामी कपड्यांना ही दुर्गंधी लागते. त्यामुळे ते साफ ठेवणे आवश्यक असते. मशिनचा ड्रम नियमित चकचकित साफ ठेवला तर आपले कपडेदेखील चमकू लागतात.
  • मशिनमधील ड्रमला समजा थोडी दुर्गंधी येत असल्यास, ही दुर्गंधी टाळण्यासाठी कपडे धुतल्यावर वॉशिंग मशिनचे झाकण थोडावेळ उघडे ठेवा आणि हवा ड्रमपर्यंत पोहचू द्या. यामुळे किटक होणार नाहीत आणि दुर्गंधीही दूर होईल.
  • कपडे धुण्यासाठी योग्य डिटर्जंट पावडरचा वापर करा. अन्यथा डिटर्जंटचे कण मशिनमध्ये तसेच साचून राहतात आणि त्यामुळे दुर्गंधी पसरते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -