घरलाईफस्टाईलहिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

हिवाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी

Subscribe

हिवाळ्यात थंडीमुळे आरोग्य बिघडते. थंडीपासून लांब राहण्यासाठी अनेकविध उपाय केले जातात. कोणी उबादार कपडे घालतो. असे असले तरी शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी काही पदार्थांची गरज असते.हिवाळ्यात थंडीचा प्रभाव कमी करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. हिवाळ्यात आहाराचे योग्य नियोजन केल्यास शरीर संतुलित राहण्यास मदत होते.

बाजरी-

थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी खावी. लहान मुलांना बाजरीची भाकरी खाऊ घालावी. बाजरीमध्ये सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण असते. बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक तत्त्व, मॅग्नेशियम, कॅल्शियम, मँगनीज, ट्रिप्टोफेन, फायबर, जीवनसत्व-ब, अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते.

- Advertisement -
मध-

हिवाळ्यात मधाचा उपयोग विशेष लाभकारी ठरतो. मधामुळे पचनक्रियेत सुधार होतो आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते. शरीराला निरोगी, स्वस्थ आणि उर्जावान ठेवण्यासाठी मधाला आयुर्वेदात अमृत मानले गेले आहे. सर्वच ऋतुंमध्ये मधाचे सेवन आरोग्यदायी आहे.

बदाम-

बदाम सालीसकट खावा. बदामात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि फायबर उपलब्ध असते. कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने महिलांनी याचे सेवन करणे फायद्याचे असते. हृदय आणि रक्त धमन्या सुरक्षित ठेवण्यास मदत होते. बदामात असलेले 65 टक्के मोनोसॅच्युरेटेड फॅट शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

- Advertisement -
आले-

नेहमीच्या आहारात आले याचा समावेश केल्यास छोट्या-मोठ्या आजारांपासून दूर राहणे शक्य आहे. हिवाळ्यात आलं कोणत्याही प्रकारे सेवन केल्यास खूप लाभ होतो. यामुळे शरीराला गरमी मिळते आणि डायजेशनही चांगले राहते. आलं तिखट रसाचे, पाचक, मलसारक आहे. आल्यामुळे पोटदुखीची समस्या त्वरित दूर होते. अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते.

शेंगदाणे-

शेंगदाणे आयर्न, कॅल्शिअम आणि झिंकचा उत्तम स्त्रोत आहे. मूठभर शेंगदाण्यामध्ये 426 कॅलरीज, 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 10 ग्रॅम प्रोटीन असते. यामध्ये व्हिटॅमिन इ, के आणि बी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये उपलब्ध असलेले अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन, मिनिरल्स आदी तत्त्व फायदेशीर ठरतात.

ओमेगा- फॅटी अ‍ॅसिड-

हिवाळ्यात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड लाभदायक ठरते. यासाठी मासे, मोहरीचे तेल, सोयाबीन, अक्रोड, जवस या पदार्थांचे सेवन करा. जवसात ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडचे प्रमाण अधिक असते. ब-1 जीवनसत्त्वामुळे चेतासंस्था उत्तम राहते. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते आणि आपण आजारांपासून दूर राहतो.

भाज्या –

दैनंदिन आहारात भाज्यांचा अवश्य समावेश करावा. भाज्या, शरीरातील प्रतिरोधक क्षमता वाढवतात आणि आपल्याला उष्णता प्रदान करतात. हिवाळ्यात मेथी, गाजर, पालक, बीट, लसूण इ. भाज्यांचे सेवन करावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -