घरलाईफस्टाईलहिवाळ्यात घ्या तुमच्या फुप्फुसांची काळजी

हिवाळ्यात घ्या तुमच्या फुप्फुसांची काळजी

Subscribe

कडक उन्हाळा आणि त्रासदायक पावसाळ्यानंतर हिवाळ्याचे आगमन झाले आहे. रात्री मोठ्या होत चालल्या आहेत आणि नववर्षाचा रोमांच शिखरावर पोहोचला आहे. मात्र, अनेकांसाठी हिवाळा हा ऋतू फारसा चांगला ठरत नाही. थंड हवामानामुळे अनेक आजार बळावतात आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम तुमच्या श्वसनमार्गावर होतो. विशेषत: दीर्घकाळापासून फुप्फुसाचे विकार असलेल्यांना हिवाळ्याचा त्रास जास्तच जाणवतो. कोरड्या हवेमुळे रुग्णांच्या श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. घरघर लागते, खोकला येतो आणि धापही लागते. अशावेळी कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

हिवाळ्यात श्वसनविकारांची शक्यता कमी करण्यासाठी घ्या अशी काळजी

* शरीराला उब राखण्यासाठी पुरेसे गरम कपडे घाला.

* दररोज प्राणायम करावा त्यामुळे श्वसनविकार टाळता येतात.

- Advertisement -

* थंडीत पोषक आहार घेणे आणि पुरेसे पाणी पिणे पण अत्यावश्यक आहे.

* तुम्हाला डॉक्टरांनी दिलेली औषधे घेण्यास विसरू नका. बदलत्या हवामानाचे संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

* तुम्ही दमेकरी (अस्थमाचे रुग्ण) किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज अर्थात सीओपीडीचे रुग्ण असाल, तर काही झटपट आराम देणारी औषधे कायम जवळ बाळगा आणि या आजारांची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टराशी संपर्क साधा.

* आंबट फळे, आंबट पदार्थ, आईस्क्रिमसारखे अतिशय थंड पदार्थ ज्याने कफ वाढेल असे पदार्थ खाण्याचे टाळा.

* शरीर उबदार राखण्यासाठी शक्य तेवढे क्रियाशील राहा. तुम्ही घरात असलात, तर एक तासाहून अधिक काळ नुसते बसून राहू नका. उठा आणि हालचाल करत राहा.

* थोडे जरी आजारी वाटले किंवा ताप आल्यास तुमच्या डॉक्टरांकडून फ्लूची औषधे घ्या आणि प्रतिकारशक्ती वाढवा. ते सर्वोत्तम संरक्षण आहे.

* गरम पेये मुबलक प्रमाणात घ्या आणि शक्य असल्यास दिवसातून एकदा तरी गरम जेवण घ्या.

* हिवाळ्यात वेळेवर खाल्ले असता शरीरात ऊर्जा चांगली राखण्यात मदत होते.
अशाप्रकारे थोडीशी काळजी घेतली आणि नियोजन केले, तर हिवाळ्यात निरोगी राहण्याची शक्यता वाढेल हे नक्की.

– डॉ. संध्या कुलकर्णी

(लेखिका फुप्फुसविकारतज्ज्ञ आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -