घरलाईफस्टाईलफ्रिझमध्ये फळे ठेवताना घ्या ही काळजी

फ्रिझमध्ये फळे ठेवताना घ्या ही काळजी

Subscribe

*भेंडी फ्रिझमध्ये ठेवताना नेहमी कोरड्या कपड्यात किंवा एअर टाईट डब्यात ठेवावी. ओली भेंडी कधीच फ्रिझमध्ये ठेऊ नका. ओली भेंडी फ्रिझमध्ये ठेवल्यास ती लवकर खराब होते.

* बदाम जास्त काळ टिकवून ठेवायचे असतील तर तुम्ही ते फ्रिझमध्ये ठेऊ शकता. बदाम जास्त काळ बाहेर ठेवल्यास त्यातील तेल निघून जाते.

- Advertisement -

* सफरचंद फ्रिझमध्ये ठेवल्याने त्यातील एन्झाइम्स अ‍ॅक्टीव्ह होतात आणि त्यामुळे ही फळे लवकर पिकतात आणि मग लवकरच खराब होतात.त्यामुळे सफरचंद फ्रिझमध्ये ठेवताना नेहमी कागदात गुंडाळून ठेवावे.

*केळी फ्रिझमध्ये ठेवल्याने लवकर काळी पडतात. त्यामुळे केळी कधीच फ्रिझमध्ये ठेऊ नयेत. इतर फळांसोबत देखील शक्यतोवर केळी ठेवू नये. कारण केळ्यांमधून निघणारा ईथेलीन गॅस त्याच्या आजूबाजूच्या फळांना पिकवतो व परिणामी इतर फळे देखील लवकर खराब होतात.

- Advertisement -

*टरबूज आणि खरबूज यामध्ये अँटी ऑक्सीडंट असते.त्यामुळे हे फळ फ्रिझमध्ये ठेवल्याने लवकर खराब होते. पण तुम्हाला हे फळ गार खायचे असेल तर खाण्यापूर्वी अर्धा तास आधी हे फळ फ्रिझमध्ये ठेवा आणि नंतर ते कापून खा.

* आलू बुखार आणि चेरी सारखी बिया असलेली फळे फ्रिझमध्ये ठेऊ नये. जर ठेवायचीच असेल तर खाण्याच्या अर्ध्या तास आधी तुम्ही ती फ्रिझमध्ये ठेऊन खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -