टूथब्रश वापरताना घ्या ही काळजी

Mumbai
टूथब्रश

आपले हास्य नेहमी टिकून राहावे यासाठी आपले दात स्वच्छ असणे आवश्यक असते. यामध्ये टूथब्रशची मोठी भुमिका असते. टूथब्रश आपल्या दातांना स्वच्छ करते आणि दातांवर जमा झालेले घटक देखील काढते. यामुळे तुम्ही योग्य टूथब्रशचा वापर करणे आवश्यक आहे.

यामुळे दातांसंबंधीत अडचणी येणार नाही. जेव्हा तुम्ही दात स्वच्छ करता तेव्हा तोंडातील व्हायरस आणि बॅक्टेरिया टूथब्रशवर लागतात. जर टूथब्रश योग्य प्रकारे स्वच्छ केला नाही तर हेच बॅक्टेरिया पुन्हा तोंडात जाऊन आपल्या दातांना आणि हिरड्यांना हानी पोहचवतात.

यामुळे तुम्हाला दातांसंबंधीत समस्या उद्भवू शकतात. जसे की, दात किडने, हिरड्यांतून रक्त येणे आणि तोंडातून दुर्गंधी येणे, यामुळे टूथब्रश स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. वेळोवेळी हे बदलत राहा. आज आम्ही तुम्हाला टूथब्रशला स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोप्या पध्दती सांगत आहोत.

नियम नंबर एक
टूथब्रश कधीच एखाद्या कंटेनरमध्ये ठेवू नका. यामुळे त्याच्यात ओलावा राहतो, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात.

नियम नंबर दोन
टूथब्रश सरळ उभा करुन ठेवा. असे केल्याने ब्रशवर जमा झालेले पाणी हळुहळू खाली जाते आणि टूथब्रश वाळण्यास मदत होते. असे केल्यामुळे ओलावा निर्माण करणारे बॅक्टेरिया तयार होत नाहीत. जर तुम्ही तुमचा टूथब्रश आडवा ठेवला तर त्यात ओलावा राहतो आणि बॅक्टेरिया निर्माण होतात.

नियम नंबर तीन
टूथब्रश शौचालयापासून कमीत कमी २ फूट अंतरावर ठेवा. कारण फ्लश करताना पाण्यातील सर्व बॅक्टेरिया हवेद्वारे पूर्ण बाथरुममध्ये पसरतात, जे तुमच्या टूथब्रशवर देखील जमा होतात.

नियम नंबर चार
आपल्या टूथब्रशच्या होल्डरला आठवड्यातून एकदा तरी अवश्य स्वच्छ करा. असे केल्याने होल्डरमध्ये जमलेले बॅक्टेरिया तुमच्या ब्रशमध्ये जाणार नाही. ब्रश होल्डरचा खालचा भाग अवश्य स्वच्छ करा.

नियम नंबर पाच
प्रयत्न करा की, घरातील सदस्यांचे टूथब्रश एकमेकांच्या संपर्कात येणार नाही. जर तुम्ही एकाच कंटेनरमध्ये अनेक टूथब्रश ठेवत असाल तर लक्ष असू द्या की ते एकमेकांना टच होणार नाही. असे केल्याने एका ब्रशचे बॅक्टेरिया सहज दुसर्‍या ब्रशमध्ये जातील.

नियम नंबर सहा
ब्रश केल्यानंतर टूथब्रश चांगल्या प्रकारे हलवून कोरडा करून घ्या. कारण टूथब्रश जेवढा जास्त ओला असेल तेवढे जास्त बॅक्टेरिया निर्माण होण्याची भीती असते.

नियम नंबर सात
आपल्या टूथब्रशला प्रत्येक ३-४ महिन्यानंतर बदलत राहा. जर ब्रिसल जास्त लवकर खराब होत असलीत तर लवकर बदला. लहान मुलांचे टूथब्रश लवकर चेंज करा, कारण ते टूथब्रशची देखरेख चांगल्या प्रकारे करू शकत नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here