नेलआर्ट करताना अशी घ्या काळजी

Mumbai
नेलआर्ट

नेलआर्टमुळे नखांचे सौंदर्य वाढते. मात्र यामुळे नखांचे नुकसान होण्याची शक्यतादेखील असते. नखं केवळ सुंदर नाहीत तर आरोग्यदायी असणेदेखील आवश्यक आहे. त्यामुळे नेल कलर्स आणि नेलपेंटच्या प्रोडक्ट्सबाबत जरा दक्षता बाळगा.

चांगल्या दर्जाचे रिमुव्हर – नेलपॉलिश रिमुव्हर हे उत्तम दर्जाचे असणे आवश्यक आहे. नैसर्गिक घटक मिश्रित अ‍ॅसिटोन किंवा अल्कोहोल हे सामान्य अ‍ॅसिटोनपेक्षा उत्तम पर्याय आहे. अ‍ॅसिटोनमधील मजबूत घटकांमुळे नखांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे अ‍ॅसिटोन निवडा.

नेल फाईलिंग – हे नेहमी एकाच दिशेने करावे. सतत पुढेमागे घासल्याने नखं तुटू शकतात. नखं खूपच लांब असतील तर ती मध्यम आकारात कापा.

क्युटीकल्स केअर – क्युटीकल्सना कापणे म्हणजे त्यांना इजा पोहचवणे किंवा संसर्गाला आमंत्रण देणे. क्युटीकल्सचा एखादा भाग वर आलेला आढळल्यास त्याला कात्रीने कापा किंवा हात काही वेळ पाण्यात ठेवून क्युटीकल्स मऊ करा आणि हलक्याच हाताने ओढा.

बेस कोट – बेस कोटची निवड अवश्य करा. यामुळे तुम्ही गडद रंगाचे नेलपॉलिश लावले तरीही नखांचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होतो. बेस कोटमुळे नेलपेंट अधिक चमकदार होते व मॅनिक्युअरदेखील अधिक काळ राहते.

नेलपेंट सुकवा – नेलपेंट पूर्ण सुकवण्यासाठी हातांची बोट ताठ ठेवून बसणं कंटाळवाणं वाटतं म्हणून तुम्ही ब्लो ड्रायर किंवा युव्ही लाईटचा वापर करताय का? पण यामुळे नेलपेंट सोबतच नखंदेखील सुकतात. अशी निस्तेज नखं कमजोर दिसतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here