आपल्या ब्लड ग्रुपप्रमाणे घ्या आहार

ब्लड ग्रुपच्या हिशोबाने आहार निवडल्याने आपण फिट राहाल.

Mumbai
blood-Group

जर आपण आपल्या ब्लड ग्रुपप्रमाणे आहाराचे सेवन केले तर नेहमी निरोगी राहाल असे एका संशोधनातून समोर आले आहे. ब्लड ग्रुपच्या हिशोबाने आहार निवडल्याने आपण फिट राहाल. कित्येकदा हे पाहण्यात येत असेल की एखाद्या पदार्थांचा वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगळा प्रभाव पडत असतो, असे होण्यामागे एक कारण वेग-वेगळे ब्लड ग्रुप असणेही आहे. पाहा आपल्या ब्लड ग्रुपसाठी कोणता आहार योग्य आहे ते.

ग्रुप ओ

यूनिवर्सल ब्लड ग्रुप ओ असणार्‍यांनी उच्च प्रोटीन आढळणारे खाद्य पदार्थ आणि मीठ अधिक मात्रेत सेवन करायला हवे.अशा व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ टाळावेत किंवा कमी प्रमाणात खावे.

ग्रुप ए

ए ब्लड ग्रुप असणार्‍या लोकांनी हिरव्या पालेभाज्या, धान्य, बीन्स, कडधान्य, फळं, सुके मेवे, ब्रेड आणि चायनीज फुड्सला प्राथमिकता द्यायला हवी. अशा लोकांनी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मीठ, दुधाने तयार केलेले पदार्थ आणि गव्हाचे पीठ खाणे शक्यतोवर कमी करावे किंवा टाळावे.

ग्रुप बी

बी ब्लड ग्रुप असलेले लोक अनेक प्रकाराचा आहार सेवन करू शकतात. त्यांनी मटण,भाज्या व धान्य आहारात घ्यायला हव्यात. तसे या ग्रुपच्या लोकांना जवळजवळ सर्व प्रकाराचा आहार चालतो. तरी पॅक्ड फूड, फुलकोबी, कॉन, शेंगदाणे, मसुरची डाळ, तीळ अशा वस्तू टाळाव्यात.

ग्रुप एबी

एबी ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना मीठ- फिश, भाज्या, कार्बोहाइड्रेट्स, डेअरी प्रॉडक्ट्स खाणे योग्य ठरेल. अशा लोकांनी अधिक मात्रेत प्रोटिनचे सेवन केले पाहिजे. या लोकांनी रेड मीट आणि कॉर्न टाळावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here