घरलाईफस्टाईलरुचकर जेवणासाठी खास टीप्स

रुचकर जेवणासाठी खास टीप्स

Subscribe

स्वयंपाकघरातील काही टिप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

  • समोसेकरीत असताना बाटाट्याच्या मिश्रणात थोडेसे चण्याचे पीठ भाजून घातल्यास समोसे अधिक चवदार होतात.
  • टोमॅटो जास्त पिकले असतील किंवा कापता कठीण जात असेल, तर टोमॅटो थोडावेळ बर्फाच्या पाण्यात टाका, टोमॅटो आपोआप कडक होईल.
  • पदार्थ तळताना तेलास फेस आल्यास त्यात दोन आमसूल किंवा चिमूटभर मीठ घालावे.
  • लोणी कढवताना त्यात दोन विड्याची पाने आणि अर्धा चमचा मीठ टाकावे म्हणजे तुपाला दुर्गंधी येत नाही.
  • अळूची वडी करताना त्यात चिंच टाकावी म्हणजे खाताना घशाला खाज येत नाही.
  • पाण्याची टाकी शेवाळली असल्यास त्यावर चुना टाका आणि नारळाच्या ब्रशने साफ करावे.
  • केक बनवताना अंड्याच्या ऐवजी पिकलेली केळी किंवा दह्यामध्ये थोडी साखर आणि थोडे मीठ घालून वापरु शकता.
  • श्रीखंड फसफसू नये, म्हणून चक्का फेटावा आणि साखर भिजेल इतके दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेटलेला चक्का चांगला मिक्स करुन घ्यावा.
  • आंब्याचा रस, श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा, यामुळे आंबटपणा निघून जातो.
  • गुलाबजाम चांगले होण्यासाठी खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळले तर पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम चांगले हलके होतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -