कैरीच्या चटपटीत पाककृती

कैर्‍यांच्या काही चटपटीत पदार्थांच्या साध्यासोप्या आणि सहज पाककृती..

Mumbai

कैरी म्हटले की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही. आंब्याच्या अनेक रेसिपीज तुम्ही तयार केल्या असतील, पण नुसत्या कैर्‍या खाण्यापेक्षा आज आम्ही घेऊन आलो आहोत कैर्‍यांच्या काही चटपटीत पदार्थांच्या साध्यासोप्या आणि सहज पाककृती..

लुंजी

साहित्य

२ कैऱ्या,२ चमचे तेल, जीर, मोहरी फोडणीसाठी, चवीनुसार मीठ, पाव चमचा – हळद, पाव चमचा – तिखट, २ मध्यम आकाराचे गुळाचे खडे, पाणी

कृती
– छोटी कढई किंवा जरमन च एखादं भांड गॅसवर ठेवावं.
– त्यात सांगितलं तेवढ तेल घालाव.
– गरम झाल्यावर त्यात मोहरी , जीर्‍याची फोडणी घालावी.
– तडतडल्यावर त्यात कैरीच्या फोडी टाकाव्या .
– व्यवस्थित हलवून घेतल्यावर त्यात तिखट, मीठ, हळद आणि गुळाचे खडे टाकावे .. त्यानंतर त्यात अर्धी वाटी पियाचं पाणी टाकून झाकण ठेवून ५ ते ७ मनिटे शिजू द्यावं.

कैरीचं आंबट-गोड टॉपिंग 

साहित्य 
१ वाटी कैरी, १/४ प्रत्येकी जर्दाळू, खजूर आणि बेदाणा, अर्धी वाटी साखर, मीठ

कृती :
– जर्दाळू आणि खजुराच्या बिया काढून पाण्यात भिजवा.
– बेदाणाही भिजवा. 2-3 खजूर आणि जर्दाळू बारीक चिरून घ्या.
– तासाभराने जर्दाळू, खजूर, बेदाणा आणि कैरीचा कीस मिक्‍सरवर बारीक करून घ्या.
– यात एक वाटी पाणी, साखर आणि चिरलेले खजूर आणि जर्दाळू मिक्‍स करून झाकून ठेवा.
– अर्ध्या तासाने जाड बुडाच्या पातेल्यात बारीक गॅसवर शिजायला ठेवा. मीठ घाला. ढवळत रहा.
– या मिश्रणाला छान तकाकी आल्यावर उतरवा.
– गार झाल्यावर आइस्क्रिम टॉपिंग म्हणून वापरा.
– हवं असेल तर एक वाटी आंब्याचा रसही शिजताना मिक्‍स करू शकता.
– टोस्ट, पॅनकेक्‍स, केक्‍स, पोळी- कशावरही टॉपिंग म्हणून मस्त.