घरलाईफस्टाईलफोर्ट भागात चमचमीत सी-फूड

फोर्ट भागात चमचमीत सी-फूड

Subscribe

फोर्ट, चर्चगेट अशा ऑफिस असलेल्या भागात मात्र मालवणी पदार्थांचे पर्याय उपलब्ध नाहीत. मात्र फोर्टमधील कावसजी पटेल स्ट्रीटवरील महेश हॉटेल त्याला अपवाद आहे. फोर्ट विभागात कामाला जाणार्‍या खव्वयांचा गेली अनेक दशके हे हॉटेल पोटोबा करत आहे. या हॉटेलमध्ये शिरताना आपण मालवणी पद्धतीचे पदार्थ खायला जातोय, हे मनाशी पक्के करायला हवे. कारण हॉटेलमधील पदार्थांची चव शंभर टक्के मालवणी नसली तरी त्या जवळची नक्कीच आहे.

गिरगाव, दादर, परळ, लालबाग अशा कोकणी माणसांचे वास्तव्य असलेल्या भागात तुम्ही कधी गेलात आणि चमचमीत मालवणी पदार्थ खावेसे वाटले तर तुम्हाला अनेक हॉटेलचे पर्याय उपलब्ध होतात. पण फोर्ट, चर्चगेट अशा ऑफिस असलेल्या भागात मात्र मालवणी पदार्थांचे पर्याय उपलब्ध नाहीत. मात्र फोर्टमधील कावसजी पटेल स्ट्रीटवरील महेश हॉटेल त्याला अपवाद आहे. फोर्ट विभागात कामाला जाणार्‍या खव्वयांचा गेली अनेक दशके हे हॉटेल पोटोबा करत आहे. या हॉटेलमध्ये शिरताना आपण मालवणी पद्धतीचे पदार्थ खायला जातोय, हे मनाशी पक्के करायला हवे. कारण हॉटेलमधील पदार्थांची चव शंभर टक्के मालवणी नसली तरी त्या जवळची नक्कीच आहे. मात्र पक्के मालवणी या पदार्थांना मालवणी मानत नाहीत. त्यांच्यादृष्टीने हे पदार्थ मंगळुरू पद्धतीचे आहेत. पण एक गोष्ट खरी की येथील पदार्थांचे चव मनाला आणि पोटाला दिलासा देते. जे काही समुद्रात उपलब्ध आहे ते या हॉटेलमध्ये मिळते असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. महेशमधील तळलेले पापलेट, सुरमई आणि बांगडा हे या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे.

येथे शिरणारा प्रत्येक व्यक्ती या पदार्थांच्या प्रेमात पडतो. त्यामुळे हे मासे लवकर संपतातही. त्यामुळे कधी महेशमध्ये आलात तर सुरुवातीलाच या माशांची ऑर्डर देऊन मोकळे व्हा मग निराशा टळते. तळलेल्या माशांसोबतच येथील खेकडे, कोळंबी मसाला या डिश विशेष. विशेषत: खेकडा मसाला हा खवय्यांना अधिक भावतो. त्याचे कारण म्हणजे मंगळुरु मसाले. खेकडे हे मंगळुरू पद्धतीनेच चांगलेच लागतात. मालवणीपद्धतीने तयार केलेल्या खेकड्यांमध्येही एक चांगली चव असली तरी मंगळुरू खेकडे त्यापेक्षा चवीला असतात. त्याचबरोबर रवा लावून तळलेले बोंबिल हे अधिक क्रंची असतात. मालवणीपद्धतीत कोणतेही मासे तळाताना त्याला तांदळाचे पीठ लावले जाते. पण महेशमध्ये मासे तळताना त्याला रवा लावला जातो. त्यामुळे ते जास्त खुसखुशीत होतात. महेशचा कोळंबी भातही एकदा ट्राय करायला हरकत नाही. १९७३ सालापासून हे महेश हॉटेल फोर्ट भागात कामाला येणार्‍या खवय्यांचे उदरभरण करत आहे. विशेष म्हणजे रविवारीही हे हॉटेल खुले असते. त्यामुळे कधी वेळ काढून रविवारी या हॉटेलमध्ये जायला काही हरकत नाही. फोर्ट भागात चमचमीत सी-फूड खायचे असेल तर हॉटेल महेशमध्ये जायला हवे.
हॉटेल महेश, कावसजी पटेल स्ट्रीट, फोर्ट

- Advertisement -

-आबा माळकर


 

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -