उन्हाळ्यात त्वचेला कांदा चोळल्याने ‘हे’ होतात फायदे

Mumbai
the benefits of rubbing onion on the skin in summer
उन्हाळ्यात त्वचेला कांदा चोळल्याने 'हे' होतात फायदे

कोरोनाच्या प्रादुर्भाव लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यामुळे सध्या सगळे घरी स्वतःची काळजी घेताना दिसत आहे. तसंच त्वचेसाठी देखील घरगुती उपाय करत आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे या काळात आपल्या जवळपास आणि कपड्यांमध्ये कांदा ठेवल्याने उष्माघातापासून बचाव होतो. तसेच कांद्याचे सेवन करणे आरोग्यास फायदेशीर असते. कांद्या केवळ खाण्यासाठीच नव्हे तर त्वचेवर चोळण्यासाठी देखील वापरला जातो. त्यामुळे आज आपण कांदा त्वचेवर चोळण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेणार आहोत.

कांद्याचा रस किंवा किसलेला कांदा त्वचेला लावल्यामुळे त्वचेचे संसर्गापासून रक्षण होते.

त्वचेवर कांदा चोळल्याने उष्णता शांत होते आणि शरीराचे तापमान पण संतुलित राहते.

डोक्यावरील त्वचेवर जर कांदा चोळलात तर केस गळती कमी होते. तसंच केसात उवा असतील तर त्याचा नायनाट होतो.

पायच्या तळव्याला कांदा चोळल्याने जळजळ पासून त्वरित आराम मिळतो.

डास चावल्याने लालसर मुरूम किंवा फोड येता आणि थोडी त्वचा सुचते. अशावेळी कांदा कापून लावल्याने वेदनेपासून मुक्ती मिळते आणि लालसरपणा देखील कमी होतो.


हेही वाचा – पांढऱ्या केसांवर घरगुती उपाय जाणून घ्या