घरलाईफस्टाईलएकाच जागी अनेक तास बसण्याचे दुष्परिणाम

एकाच जागी अनेक तास बसण्याचे दुष्परिणाम

Subscribe

कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही एकाच ठिकाणी बराच वेळ बसत असाल तर ते तुमच्या शरीरासाठी धोक्याचे आहे. यामुळे तुमच्या फिटनेसवर विपरित प्रभाव होवू शकतो. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर.

* कमरेवर होणारा प्रभाव
ज्यावेळी आपण एखादी गोष्ट घेण्यासाठी खाली वाकतो. त्यावेळी कमरेतील डिस्क एखाद्या स्पंजप्रमाणे पसरत असते अथवा आकुंचन पावत असते. यामुळे फ्रेश ब्लड आणि न्यूट्रिएंट्स शोषून घेते. एकाच जागी जास्त वेळ बसल्याने या प्रक्रियेवर प्रभाव पडण्यास सुरुवात होते. कमरेतील लवचिकता कमी होण्यास सुरुवात होते. यामुळे तुम्हाला कमरेचा त्रास होण्याची भीती असते.

- Advertisement -

* पायांवर होणारा परिणाम
एकाच जागेवर बसण्याने पायांमधील रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे पायांवर सूज येण्याची भीती असते. चालण्याने आणि धावल्याने पायांची हाडे मजबूत होण्यास मदत होते. एकाच जागी बसल्याने ओस्टिओपोरोसिस (हाडे कमजोर) होण्याची भीती असते.

* विविध अवयवांवर होणारा परिणाम
एका जागी जास्त वेळ बसल्याने फॅट कमी प्रमाणात बर्न होते. यामुळे फॅटी अ‍ॅसिड्स शरीरात जमण्यास सुरुवात होते. यामुळे तुम्हाला हृदयासंबंधी आजाराचा सामना करावा लागू शकतो.

- Advertisement -

पॅन्क्रियाज जास्ती प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करण्यास सुरुवात करते त्यामुळे तुम्हाला मधूमेह सारखे आजार होण्याची भीती अधिक असते.

* मसल्सवर होणारा परिणाम
खुर्चीवर वाकून बसल्याने पोटातील मसल्सचा उपयोग केला जात नाही. याचा परिणाम पाठीच्या मसल्सवर आणि हाडांवर होण्यास सुरुवात होते. यामुळे तुमचे पोश्चर (शरीराची ठेवण) बिघडू शकते.

तुमच्या जांघेतील छोटे मसल्स टाइट होण्यास सुरुवात होते. एकाच जागेवर बसून राहिल्याने त्यांना गती कमी मिळते. यामुळे शरीराचा बॅलेंस आणि लवचिकता कमी होण्यास सुरुवात होते.

* शरीराच्या वरील भागांवर होणारा प्रभाव 
चालण्याने-फिरण्याने मेंदू फ्रेश राहण्यास मदत होते. यामुळे मेंदूला ऑक्सिजन आणि योग्य प्रमाणात रक्त पोहचण्यास मदत होते. एकाच जागी बसल्याने मेंदू सुस्त होतो.

सतत खाली मान घालून बसल्याने मानेच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच खांदे आणि पाठीच्या मणक्यांवर देखील याचा प्रभाव पडण्यास सुरुवात होते.

अशी ठेवा बसण्याची पद्धत
– खांदे ढिल्ले ठेवा
– पुढे वाकून बसा
– कमरेच्या खालच्या बाजूला सपोर्ट देण्याचा प्रयत्न करा.

* व्यायाम करणे गरजेचे
दिवसातून कमीत कमी एक वेळा 3 मिनिटांसाठी मांडीचे मसल्स स्ट्रेच करा.
कंबर लवचिक ठेवण्यासाठी योगासने करा.

* आवश्यक टिप्स
एखाद्या अस्थिर आसनावर (एक्सरसाइज बॉल अथवा स्टूल) वर बसावे. असे केल्याने कोर मसल्स (पोट-कमरेच्या मांसपेशी) काम करू लागतील. सरळ बसण्याचा प्रयत्न करा. तसेच पाय सरळ ठेवा.

अधून-मधून खुर्चीतून उठून फिरा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -