घरलाईफस्टाईलचेहर्‍यावर पुन्हा पुन्हा त्याच जागी पिंपल येतात ?

चेहर्‍यावर पुन्हा पुन्हा त्याच जागी पिंपल येतात ?

Subscribe

पिंपलचा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपाय, उत्तम फेसवॉश वापरणे यासारखे सारे खटाटोप करता. परंतु, अनेकांमध्ये विशिष्ट काळानंतर पुन्हा त्याच जागी पिंपल येण्याची समस्या आढळून येते. पिंपल्सचे चेहर्‍यावर त्याच त्याच जागी पुन्हा येणं यामागील नेमकं काय याबद्दलचा खास सल्ला डरमॅटोलॉजिस्ट डॉ. सेजल शहा यांनी दिला आहे.

त्वचेच्या खाली वाढणारे पिंपल्स अनेकदा त्वचेवर दिसत नाहीत. त्वचेवरील छिद्रांमधून जेव्हा तेल बाहेर पडण्याची प्रक्रिया वाढते तेव्हा सूजही वाढते. त्वचेच्या खाली तेलामुळे गोलाकार फुगवठा निर्माण होतो. त्याचे प्रमाण तेलावर अवलंबून असते.

- Advertisement -

तसेच तुम्हांला सतत चेहर्‍याला हात लावण्याची सवय असेल तर पुन्हा त्याच जागी अ‍ॅक्ने वाढण्याचा धोका अधिक असतो. सतत चेहर्‍याला हात लावण्याच्या सवयीमुळे चेहर्‍यावरील मळ, तेल पुन्हा छिद्रांमध्ये ढकलला जातो. यामुळे पिंपल्सची वाढ अधिक प्रमाणात होते.

पिंपलमध्ये पस निर्माण झालेला असल्यास त्याला फोडण्याचा मोह टाळा. त्याला सतत हात लावू नका. ते आपोआपच कमी होण्यासाठी थोडा वेळ द्या किंवा डरमॅटोलॉजिस्टचा सल्ला घ्या.

- Advertisement -

अनेकदा पिंपल फोडल्यानंतरही त्यातील सारा पांढरा भाग/पस बाहेर पडत नाही. त्यामुळे पुन्हा त्याजागी पिंपल वाढण्याची शक्यता निर्माण होते.

म्हणूनच चेहरा पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी योग्य फेसवॉशचा वापर करा. यामुळे चेहर्‍यावरील अतिरिक्त तेल काढण्यास मदत होते. त्वचेसाठी योग्य उत्पादनांची निवड केल्यास त्वचेवर वाढणारे आणि अ‍ॅक्नेच्या निर्मितीला कारणीभूत ठरणार्‍या बॅक्टेरियांचा प्रभाव कमी करण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -