घरलाईफस्टाईलगर्भवतीच्या आहारावर ठरतो मुलाचा स्वभाव

गर्भवतीच्या आहारावर ठरतो मुलाचा स्वभाव

Subscribe

गर्भवतीने केलेल्या आहारानुसार पोटातल्या बाळाची बुद्धीमत्ता, वर्तणूक आणि स्वभाव हे निश्चित होत असतात. असा निष्कर्ष अमेरिकेतल्या एका संस्थेने प्रयोगाअंती काढला आहे.गर्भवतींच्या आहारामध्ये जीवनसत्व ब, फॉलिक अ‍ॅसिड, लोह, आयोडीन यांचा अंतर्भाव केला असता त्यांचे निरनिराळे परिणाम मुलांवर कसे होत असतात, याचे प्रदीर्घकाळपर्यंत निरीक्षण करण्यात आले. या मुलांच्या वर्तणुकीचा जन्माच्या दिवसापासून नवव्या वर्षांपर्यंत अभ्यास करण्यात आला. प्राध्यापक क्रिस्तिना कंपाय यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी न्यूट्रीमेंट हा संशोधन कार्यक्रम विकसित केला असून, त्यानुसार निरीक्षणे केली आहेत.

मुलाच्या मेंदूवर होणारे परिणाम हे एखाद दुसर्‍या निरीक्षणावरून ताडता येत नाहीत. कारण मेंदूचा विकास सावकाश होत असतो आणि त्याच्यावर होणारे परिणाम अभ्यासणे हा अतिशय गुंतागुंतीचा विषय असतो.

- Advertisement -

त्यामुळे पहिल्या दिवसापासून नवव्या वर्षापर्यंत निरीक्षणे करण्यात आली. मुलांच्या वर्तणुकीवर आणि स्वभावावर गर्भावस्थेतील आहाराशिवाय पालकांचे शिक्षण, शैक्षणिक, आर्थिक स्तर, मुलांच्या जन्माच्या वेळी आई आणि वडिलांचे वय याही गोष्टींचे परिणाम होत असतात, असेही त्यांच्या निरीक्षणातून दिसून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -