घरलाईफस्टाईलवाढते वय व पुरुषांमधील वंध्यत्वामधील संबंध

वाढते वय व पुरुषांमधील वंध्यत्वामधील संबंध

Subscribe

आघात, प्रादुर्भाव यांमुळे तरुण वयात वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते

पुरुषांमधील शुक्राणूंची कमी निर्मिती, शुक्राणूंचे अपसामान्य (अॅबनॉर्मल) कार्य व शुक्राणूंच्या मार्गातील अडथळे ही वंध्यत्वाची कारणे असतात. आजारपण, दुखापती, आधीपासून असलेले आजार, चुकीची जीवनशैली आदी कारणांमुळे शुक्राणूंच्या समस्या येतात. शिवाय, वाढत्या वयासोबत प्रजननक्षमताही कमी होते. वंध्यत्व कोणत्या वयात समजते, यावर त्याचे कारण अवलंबून असते. जनुकीय व औषधांमुळे निर्माण झालेले वंध्यत्व कमी वयातही दिसून येते. तणावामुळे निर्माण झालेले वंध्यत्व प्रजननाच्या दृष्टीने कमी वयात दिसून येते. आघात, प्रादुर्भाव यांमुळे तरुण वयात वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय वय वाढणे, आनुवांशिकता, प्रादुर्भाव, मॅलिग्नन्सी, ट्युमर्स, आघात, आजार, अपरिचित वृषण अर्थात क्रिप्टोर्चिडिडम, अमली पदार्थ व मद्यपान, धुम्रपान, कामाच्या ठिकाणी उच्च तापमानाचा संपर्क येणे, अतिस्थूलपणा, अतिश्रम यांसोबतच काही स्पष्ट न होऊ शकणाऱ्या किंवा इडियोपॅथिक कारणांमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या दिसून येते. अशा परिस्थितीत पुरुष लैंगिकदृष्ट्या सक्रिय राहतात. इतर कारणे नसल्याचे स्पष्ट झाल्यास वयोमानपरत्वे कामवासना कमी होणे, इच्छा कमी होणे, वारंवारता कमी होते. इरेक्शनसंदर्भातील (शिश्न ताठर होण्याशी संबंधित) काही समस्यांमुळे, शिश्न वाकडे असणे किंवा वेळेपूर्वीच स्खलन (इजॅक्युलेशन) आदींमुळे पुरुषांमध्ये पूर्णपणे पेनिट्रेशन न होण्यासारखी लक्षणे दिसून येतात.

पुरुषांमधील वंध्यत्वाबाबत हे माहित आहे का?

- Advertisement -

इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा वेळेपूर्वी स्खलन होणे यांसारख्या लैंगिक संबंध ठेवण्यातील समस्या येणाऱ्यांना वंध्यत्वाच्या समस्येची जाणीव नसते. यामध्ये रुग्णाला वंध्यत्वाहून अधिक तणाव असतो तो लैंगिक संबंध ठेवण्यात कमी पडण्याचा. वंध्यत्व हा येथे अप्रत्यक्ष परिणाम ठरतो. प्रादुर्भावांमुळे लैंगिक संबंध वेदनादायी झाल्यास त्याची जाणीव त्यांना होते पण तीही लैंगिक संबंध नीट ठेवू न शकल्यामुळे. अपरिचित वृषणांच्या समस्येत रुग्णाला कळू शकते की, अंडाशय आकाराने लहान आहे किंवा रिकामे आहे. बाकी समस्यांचे निदान वीर्य विश्लेषण चाचणीच्या माध्यमातून केलेल्या जोडप्याच्या तपासणीतून होते.

याचे निदान कसे होते?

कुटुंबाचा सविस्तर इतिहास जाणून घेतला जातो आणि शारीरिक तपासणी केली जाते. त्यानंतर काही रक्ताच्या चाचण्या, अल्ट्रासाउंड व वीर्य विश्लेषण चाचणी केली जाते.

- Advertisement -

पुरुषांच्या वंध्यत्वाचा संबंध या धोक्यांशी आहे

स्त्रीमध्ये गर्भधारणा करून देण्यातील असमर्थतेशिवाय पुरुषांमधील वंध्यत्वाशी मधुमेह, पिट्युटरी ग्रंथींच्या कामातील बिघाड व जननेंद्रियांचे प्रादुर्भाव आदींचा संबंध असतो. पत्नीला गरोदर करण्यातील असमर्थता, इरेक्टाइल डिसफंक्शन (ईडी) आणि वेळेपूर्वी होणारे स्खलन (पीई) यांमुळे जोडप्यामध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ शकतात व नातेसंबंधांत समस्या येऊ शकतात.

पुरुषांमधील वंध्यत्वावर उपचार

वंध्यत्वाला कारणीभूत आजार आणि प्रजननक्षमतेची किती हानी झालेली आहे यांनुसार उपचार बदलतात. शिवाय, वंध्यत्वाच्या परिस्थितीत स्त्री जोडीदाराची प्रजननक्षमताही लक्षात घेतली पाहिजे. प्रीटेस्टिक्युलर समस्या सहसा वैद्यकीय साधने व हस्तक्षेपाने दूर होऊ शकतात. अंडाशयावर आधारित पुरुषांमधील वंध्यत्वावर औषधांनी उपचार होत नाहीत. इंट्रायुटेराइन इन्सेमिनेशन (आययूआय), इन व्हायट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) किंवा इंट्रासायटोप्लास्मॅटिक स्पर्म इंजेक्शनद्वारे (आयसीएसआय) शुक्राणू सोडणे या सामान्य पद्धती आहेत. आयव्हीएफआयसीएसआयमध्ये अगदी थोड्या शुक्राणूंसहही गर्भधारणा होऊ शकते. पोस्टटेस्टीक्युलर वंध्यत्वामध्ये अडथळा येणारी कारणे शस्त्रक्रिया किंवा आयव्हीएफआयसीएसआयने दूर केली जाऊ शकतात. इजॅक्युलेशनशी संबंधित समस्या औषधांनी किंवा आययूआय उपचारांनी किंवा आयव्हीएफने दूर होऊ शकतात. ऑक्सिडेटिव तणाव दूर करण्यासाठी जीवनसत्त्व ई दिले जाऊ शकते. हायपोहायपो प्रकारचे वंध्यत्व दूर करण्यासाठी हार्मोन्स वापरले जाऊ शकतात.

(डॉ. अनू विनोद विज, प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -